बीडच्या पाटोदा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत 21 लाखांची रोबोटिक संगणक लॅब; माजी विद्यार्थ्याचा उपक्रम - रोबोटिक संगणक लॅब झेडपी शाळा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
बीडच्या पाटोदा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत 21 लाखांची रोबोटिक संगणक लॅब (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : July 14, 2026 at 12:30 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बीड - आयआयटी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक संगणकीय लॅब आता बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतही उपलब्ध झाली आहे. शाळेचे माजी विद्यार्थी आणि उद्योजक प्रदीप नारायणकर यांनी पुढाकार घेऊन 21 लाख रुपये खर्च करून ही रोबोटिक संगणक लॅब उभारली आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले. भाजपा आमदार सुरेश धस आणि बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन झाले.

उद्योजक प्रदीप नारायणकर यांनी सांगितले की, भटक्या विमुक्त आणि ऊसतोड मजुरांच्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, या उद्देशाने ही लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि ते वैज्ञानिक प्रयोगांमध्ये नावलौकिक मिळवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भविष्यातील संधी लक्षात घेता, विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रात उज्ज्वल करिअर करता यावे, यासाठी ही लॅब अत्यंत महत्त्वाची ठरेल. आम्हाला आमच्या काळात अशा सुविधा मिळाल्या नाहीत, पण या विद्यार्थ्यांना त्या मिळाव्यात हाच आमचा उद्देश आहे, असे नारायणकर म्हणाले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी मतदारसंघातील शाळांच्या विकासासाठी आपण विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थ्यांनीही योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पाटोदा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत.