Live : राष्ट्रसेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या दिग्गजांचा 'रामोजी एक्सलन्स अवार्ड'नं सन्मान, पाहा लाईव्ह - RAMOJI EXCELLENCE AWARDS 2025
🎬 Watch Now: Feature Video

Published : November 16, 2025 at 6:33 PM IST
|Updated : November 16, 2025 at 9:18 PM IST
हैदराबाद : पद्मविभूषण रामोजी राव यांनी माध्यमं, उद्योग आणि सार्वजनिक सेवेतून राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांच्या जयंतीनिमित्त रामोजी फिल्म सिटीमध्ये आज 'रामोजी एक्सलन्स अवॉर्ड्स 2025' पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सेवा, शिस्त आणि राष्ट्रनिर्माणाच्या मूल्यांना मूर्त रूप देणाऱ्या सात श्रेणीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांना या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. यात पत्रकारिता, ग्रामीण विकास, मानव सेवा, कला आणि संस्कृती, युवा आयकॉन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला अचिव्हर्स आदी पुरस्कारांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी, माजी उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू, भारताचे माजी सरन्यायाधीश एन व्ही रमणा, नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांचा समावेश आहे.