पुण्यात महापालिकेच्या हलगर्जीपणाविरोधात फ्लेक्सबाजी! 'आम्ही आमचा बाजार उठवला' फलक लावत नागरिकांचा संताप - PUNE ROAD CONDITIONS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
नागरिकांनी लावलेला बॅनर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : July 5, 2026 at 5:08 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : राज्यासह पुण्यात दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं पुण्यातील अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. सय्यदनगरमध्ये पुणे महापालिकेनं ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम केलं होतं. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करणं बंधनकारक असतानाही तो आजपर्यंत दुरुस्त केलेला नाही. त्यामुळं मुसळधार पावसामुळं रस्त्यावर खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. यामुळं संतप्त नागरिकांनी फ्लेक्सबाजी करत प्रशासनाला कारवाईची मागणी केली आहे. हडपसरमधील सय्यदनगर परिसरात रस्ता उखडलेल्या अवस्थेत असल्याने या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकाने परिसरात फलक लावला आहे. "आम्ही आमचा बाजार उठवला" असा मजकूर असलेल्या या फलकातून प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराविरोधातील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

ABOUT THE AUTHOR

ETV Bharat Marathi’s extensive presence and commitment to showcase the diverse stories and happenings from all 36 districts of Maharashtra, cater to Marathi audience in India and elsewhere. Having a broad presence across the state allows us to capture a wide range of perspectives and experiences, contributing to a more comprehensive understanding of Marathi culture, traditions, and developments. The focus on creativity in storytelling adds depth and engagement to the news it serves and makes it more appealing to the audience....view details