पुणे अल्पवयीन अत्याचार प्रकरणी जनप्रक्षोभ : परिस्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती, आरोपीला अटक - PUNE PARVATI CRIME NEWS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेंद्र सहाणे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2026 at 1:42 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : पर्वती पायथ्याशी 9 वर्षीय नातीवर नराधम आजोबा कडून अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. आरोपीचं वय 70 वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीची आई मजुरी करत असल्यानं मुलीला आजोबाकडे ठेवलं होतं. त्यावेळी नराधमाची नात आणि नातू दोघेही घरात होते. नातवाला काही पैसे देऊन नराधम आरोपी आजोबानं बाहेर पाठवलं. त्यानंतर मुलीचे कपडे काढण्याचा त्यानं प्रयत्न केला. मुलगी ओरडत असताना शेजारच्या एका महिलेच्या लक्षात आलं म्हणून मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलिसांनी त्या वृद्धाला ताब्यात घेतलं आहे. याबाबत पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेंद्र सहाणे म्हणाले की, "मंगळवारी रात्री साडे नऊ वाजल्याचा सुमारास पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत पर्वती पायथ्याजवळ वृद्धानं आपल्या नऊ वर्षांच्या अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार केला. तेव्हा शेजारच्या बाईला त्या मुलीचा रडण्याचा आवाज आला. तेव्हा तिनं तत्काळ यात हस्तक्षेप केला आणि शेजारच्या लोकांना कळवून मुलीची सुटका केली. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार वृद्धावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details