जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त पारंपरिक गाढवांचा बाजार; राजस्थानी गाढवाला मिळाली विक्रमी किंमत - DONKEY MARKET IN JEJURI YATRA

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
प्रतिक्रिया देताना गाढव व्यापारी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : January 3, 2026 at 8:57 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बारामती : खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत, या खंडोबाच्या जेजुरी नगरीत पौष पौर्णिमेला (Paush Purnima 2026) गाढवांचा बाजार (Donkey Market) भरतो. या बाजारात देशभरातून गाढवं विक्रीला आणली जातात. या यात्रेसाठी भटक्या विमुक्त जमातीतील लाखो नागरिक दरवर्षी जेजुरीत दाखल होतात. या यात्रेचा अविभाज्य भाग असलेल्या गाढव बाजारात दरवर्षी सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होते. तर दोन हजारांहून अधिक गाढवांची विक्री होते. त्याचबरोबर बाजारात महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधूनही गाढवे विक्रीसाठी आणली जातात. गावठी गाढवांना साधारण 8 ते 10 हजार रुपये भाव मिळतो, तर काटेवाडी गाढवांना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत किंमत मिळते. मढी, सोनारी, माळेगाव (नांदेड) येथेही असा बाजार भरतो, मात्र जेजुरीचा गाढव बाजार राज्यातील सर्वात मोठा आणि पारंपरिक मानला जातो. यंदाही गाढव बाजारात मोठी आर्थिक उलाढाल झाली असून राजस्थानी गाढवाला विक्रमी दीड लाखाची किंमत मिळाल्याची माहिती, गाढव व्यापाऱ्याने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details