मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या पारंपारिक रहाडीत सूर घेता तेव्हा... - GIRISH MAHAJAN RAHAD RANGPANCHMI
🎬 Watch Now: Feature Video

Published : March 8, 2026 at 10:03 PM IST
नाशिक : नाशिकमध्ये होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरा झाली. यंदा सात पेशवेकालीन रहाडीमध्ये नाशिककर धप्पा मारून रंगपंचमी साजरी केली. अशात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या शनी चौक भागातील रहाडीत सूर मारत रंगपंचमीचा आनंद लुटला. नाशिकमध्ये 300 वर्षांपासून रहाड परंपरा चालत आली आहे. पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नाशिकमध्ये 18 व्या शतकात तब्बल 18 रहाड अस्तित्वात होत्या. मात्र काळाच्या ओघात त्यातील काही बुजल्या गेल्या. काही रहाडवर वाडे बांधल्यानं त्यांचं अस्तित्व नामशेष झालं. पण आता त्यातील प्रामुख्यानं सात रहाडी रंगपंचवी दरम्यान उघडल्या जातात. तर नुकतंच जुने नाशिकच्या मेनरोड भागातील राजेबहाद्दर लेन येथील सातवी रहाड तब्बल 80 वर्षानंतर सुरू करण्यात आली. दहा ते बारा फूट खोल असलेल्या या रहाडीत नैसर्गिक फुलांच्या लालसर केशरी रंग तयार केला होता.