रत्नागिरीत वादळाचं थैमान मोबाईल कॅमेऱ्यानं टिपली थरारक दृष्यं - STORM RAMPAGE IN RATNAGIRI
🎬 Watch Now: Feature Video

Published : May 9, 2026 at 10:20 PM IST
रत्नागिरी - शहर तसंच जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी मुसळधार पाऊस झाला. दक्षिण रत्नागिरीमध्ये सायंकाळी झालेल्या वादळाचा व्हिडिओ वेगानं सर्वत्र व्हायरल होत आहे. राजापूर तालुक्यात बेनगी गावामध्ये वाऱ्यानं थैमान घातलेले आहे. गावाची क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी चालू असताना वाऱ्यानं प्रेक्षकांची दैना उडवलेली पाहायला मिळत आहे. चक्क वादळी वाऱ्याने मैदानात हाहाकार घातलेला पाहायला मिळाला आहे. क्रिकेटच्या मैदानात आलेल्या वादळाने एका प्रेक्षकाला हवेत उडवलेलं आहे. वाऱ्याचा वेग पाहून अनेक नागरिकांची घाबरगुंडी उडालेली या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. एकीकडे एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चढत असताना, दुसरीकडे कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाच्याही घटना घडताना दिसत आहेत. त्यातीलच एक मात्र सर्वांच्याच मनात धडकी भरवणारी ही दृष्य प्रत्यक्षदर्शींनी मोबाईलमध्ये टिपली आहेत.