महाडमध्ये मनसेचा वेलकम हॉटेलवर धडक मोर्चा; पाहा व्हिडिओ - महाड परप्रांतीय दादागिरी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
महाडमध्ये मनसेचा वेलकम हॉटेलवर धडक मोर्चा (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : July 21, 2026 at 1:36 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

रायगड - महाड शहरातील बसस्थानकाजवळील वेलकम हॉटेलमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्याकडून मनसे पदाधिकाऱ्याशी कथित गैरवर्तन झाल्याच्या आरोपानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली. संबंधित कर्मचाऱ्याला समज देत हॉटेल व्यवस्थापनालाही जाब विचारण्यात आला. यावेळी हॉटेलमधील कामगारांची पोलीस पडताळणी करण्यात यावी, तसेच अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का? याची चौकशी करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली. या प्रकरणानंतर हॉटेल मालकाने दिलगिरी व्यक्त केल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हॉटेलसमोर जमा झाले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारत हॉटेल व्यवस्थापनालाही समज दिली. महाड शहरातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सर्व परप्रांतीय कामगारांची पोलीस पडताळणी करण्यात यावी, अशी मागणीही मनसेने केली.

यावेळी हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला. शोरमासाठी वापरण्यात येणाऱ्या चिकनवर कृत्रिम रंग लावला जात असल्याचा दावा करत अन्न व औषध प्रशासनाकडे याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.