ते डॉन असतील तर मै भी हूँ डॉन, जिल्हा परिषद निवडणुकांनंतर उत्तर दिलं जाईल... आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरे यांना टोला - MAHENDRA DALVI SUNIL TATKARE
🎬 Watch Now: Feature Video

Published : January 5, 2026 at 11:05 AM IST
रायगड : अलिबाग इथं रविवारी (4 जानेवारी) शिवसेना आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघाची आढावा बैठक जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी आयोजित केली होती. या बैठकीला अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. या बैठकीनंतर आमदार दळवी यांनी खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याप्रकरण, जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि स्वतःवर झालेल्या आरोपांबाबत सविस्तर भूमिका मांडली.
खोपोलीतील मंगेश काळोखे हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ता होते, असं सांगत आमदार दळवी म्हणाले की, या हत्याप्रकरणात आतापर्यंत 14 संशयीतांना अटक झाली असली, तरी या हत्येमागं केवळ वैयक्तिक वाद नसून एखादा मोठा गेम प्लॅन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही हत्या एखाद्या वरिष्ठ नेत्यांच्या आश्रयाखाली तर झाली नाही ना? असा संशयही त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेचजृ, मुरुड महोत्सवात ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावर खासदार सुनील तटकरे यांनी डान्स केल्याच्या घटनेवरून आमदार दळवी यांनी जोरदार टीका केली. 'कोणी स्वतःला डॉन समजत असेल, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल.' असा इशारादेखील दळवी यांनी दिला. मंत्री भरत गोगावले, मी आणि आमच्या सहकाऱ्यांची ताकद वाढत असल्याचा दावादेखील त्यांनी केला.
यासोबतच, अधिवेशन काळात पैशांसोबतचा फोटो व्हायरल झाल्याच्या प्रकरणावरही आमदार दळवी यांनी स्पष्टीकरण दिलं. “आम्हाला बदनाम करण्यासाठी विरोधक अशा अफवा पसरवत आहेत. हे प्रकरण अंशतः जरी खरं ठरलं असतं, तर मी तत्काळ पदाचा राजीनामा दिला असता,” असा पुनरुच्चारही त्यांनी केला.