'मतदान नोंदणी हे देशकार्य', पावसाअभावी राज्य चिंतेत, मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? पाहा व्हिडिओ - VOTER REGISTRATION
🎬 Watch Now: Feature Video

Published : July 14, 2026 at 1:20 PM IST
जळगाव - राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार नोंदणी आणि पडताळणी मोहिमेला वेग आला असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदान नोंदणीपासून ते राज्यातील पाणीटंचाई, कृत्रिम पाऊस, शरद पवार गटातील आमदारांच्या संभाव्य राजकीय हालचाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत तसेच रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांच्या टीकेवर आपली भूमिका स्पष्ट केली.
मतदार नोंदणी आणि मॅपिंगच्या कामाबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, त्यांच्या मतदारसंघात सकाळपासून पक्षाचे कार्यकर्ते, तलाठी, बीएलओ आणि बीएलए यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदार पडताळणीचे काम सुरू आहे. दुपारपर्यंत सुमारे ५० टक्के मॅपिंग पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकांनी स्वतःहून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, लोकांना मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशासन आणि पक्ष संघटना दोन्ही पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक गावात विशेष शिबिरे आयोजित करून मतदार नोंदणीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
"मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा सर्वात मोठा अधिकार आहे. हे केवळ प्रशासकीय काम नसून देशकार्य आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आणि नागरिकाने यात सहभागी झाले पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.
शरद पवार गटातील आमदारांच्या एनडीए प्रवेशावर संयत भूमिका
शरद पवार गटातील काही आमदार एनडीएमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मंत्री पाटील यांनी कोणतेही ठोस भाष्य करण्यास नकार दिला.
ते म्हणाले, "कोण कोणत्या पक्षात जातो हे आपण ठरवू शकत नाही. या संदर्भातील चर्चा मीदेखील माध्यमांमधून ऐकत आहे. सध्या प्रत्येक वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये याच विषयाची चर्चा सुरू आहे. मात्र त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही."
राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर बोलताना मंत्री पाटील यांनी चिंता व्यक्त केली. पावसाने अचानक उघडीप दिल्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले.