प्रेमाचा खरा अर्थ मातृ पितृ पूजनातून उजळला; प्रेमदिनी घुलेवाडीत पार पडला अनोखा कार्यक्रम - AHILYANAGAR MATRU PITRU PUJAN DIWAS
🎬 Watch Now: Feature Video

Published : February 14, 2026 at 8:48 PM IST
अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी इथं व्हॅलेंटाईन्स डे (दि.14) दिवशी जागतिक मातृ पितृ पूजन दिन अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्रेमदिनाच्या निमित्तानं तरुणाई वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेम व्यक्त करते. मात्र घुलेवाडीमध्ये प्रेमाचा खरा अर्थ आई-वडिलांच्या चरणी अर्पण करण्यात आला. मातृ-पितृ पूजन सोहळा समितीच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात परिसरातील तब्बल 110 आई-वडिलांचं विधिवत पाद्यपूजन करण्यात आलं. मंत्रोच्चारात आई-वडिलांना चौरंगावर बसवून त्यांच्या चरणी कृतज्ञतेची फुलं अर्पण करण्यात आली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी "प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत आई-वडिलांचा सिंहाचा वाटा असतो. त्यांच्या सहवासात काही क्षण घालवणे, त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणे हीच खरी कृतज्ञता आहे," असं सांगितलं. डॉ. प्रवीणकुमार पानसरे यांनीही "आई-वडील हयात असतानाच त्यांच्या इच्छा पूर्ण करणं आणि सेवा करणं हेच खरं कर्तव्य आहे. मृत्यूनंतरचे मोठे विधी करण्यापेक्षा जिवंतपणीची सेवा अधिक मोलाची," असा मार्मिक संदेश दिला.