दुचाकी शोरूमला मोठी आग, अनेक दुचाकी जळून खाक - FIRE IN TWO WHEELER COMPANY
🎬 Watch Now: Feature Video

Published : June 9, 2026 at 5:21 PM IST
नागपूर : हिंगणा - वाडी मार्गावर असलेल्या एका दुचाकी कंपनीच्या शोरूमला रात्री उशिराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत शोरूममधील अनेक दुचाकी जळून खाक झाल्या. त्यामुळं शोरूम मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हिंगणा वाडी मार्गावर इंदिरा राजे भोसले यांच्या मालकीचे दुचाकीचे शोरूम आहे. नेहमीप्रमाणे कर्मचारी काम आटोपून घरी परत जाण्यासाठी निघाले असता रात्री 9 वाजताच्या सुमारास जनरेटर रूमला आग लागली. बघता-बघता आगीचे लोट वाढू लागले. वाडी मार्गावर संपूर्ण परिसरात धूर दिसू लागलेला होता. तातडीने एमआयडीसी अग्निशामक दलाला आग लागल्याच्या घटनेची माहिती देण्यात आली. विभागीय अग्निशामक अधिकारी आनंद परब दोन अग्निशामक गाड्या घेऊन तातडीने घटनास्थळी पोहचले होते. तब्बल 3 तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक विभागाला यश आलं. या आगीत कंपनीचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे.