'आंदोलनाची पुन्हा वेळ आली तर...'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - MANOJ JARANGE PATIL SAI DARSHAN
🎬 Watch Now: Feature Video

Published : January 2, 2026 at 8:17 PM IST
शिर्डी - राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत असून, ते या संकटातून बाहेर पडावेत आणि राज्यातील जनता सुखी-समाधानी राहो, अशी प्रार्थना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिर्डी साईबाबांच्या चरणी केली. नवीन वर्षाच्या निमित्ताने साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, इंग्रजी कॅलेंडरमधील नवीन वर्ष आणि धार्मिक परंपरेतील नवीन वर्ष यामध्ये गफलत होत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. सध्या पुन्हा आंदोलन करण्याची गरज वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं. आरक्षणाची जबाबदारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर असून समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री यांनी मराठवाड्याचा जीआर निघाल्याचं सांगितल्याने योग्य पद्धतीने काम होईल असा विश्वास असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, पुन्हा आंदोलनाची वेळ आली तर सरकारची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.