'धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यास परिणाम भोगावे लागतील'- मनोज जरांगे पाटील - DHANANJAY MUNDE
🎬 Watch Now: Feature Video

Published : July 20, 2026 at 9:00 PM IST
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी धनंजय मुंडे, दिल्लीतील आंदोलन आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, "बीडमध्ये काहीही घडलं की माझंच नाव घेतलं जातं. तुझं नाव घ्यायला तू कोण लागून गेला? तुझ्या वागण्यामुळं मराठा-वंजारी समाजात वैर निर्माण झालं." संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोर्चे काढण्यामागेही धनंजय मुंडे यांची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी दावा केला की, "अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी गुंडागर्दीमुळं धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर केलं. त्यांना पुन्हा मंत्रिपद दिल्यास मराठा समाज भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जाईल. त्याचे राजकीय परिणाम दोन्ही पक्षांना भोगावे लागतील."जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना 'उपद्रवी' संबोधत त्यांच्यामुळं मराठा आणि वंजारी समाजातील सलोखा बिघडल्याचाही आरोप केला. तसेच संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांवरही आरोप केले.