आमदार सुरेश धस यांनी घेतलं पिंपळेश्वर महादेवाचं दर्शन, भाविकांसाठी बनवली खिचडी - MAHASHIVRATRI 2026

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
आमदार सुरेश धस यांनी घेतलं पिंपळेश्वर महादेवाचं दर्शन (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : February 15, 2026 at 7:45 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बीड - आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. राज्यातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. भाजपा आमदार सुरेश धस यांनीही आष्टीमधील प्रसिद्ध पिंपळेश्वर महादेव मंदिरात जात दर्शन घेतलं व मनोभावे पूजा केली. यावेळी लाखो आष्टीकरांनी पिंपळेश्वर मंदिरात गर्दी करत महादेवाचं दर्शन घेतलं. पिंपळेश्वर महादेव मंदिराला मोठा इतिहास आहे. बीड जिल्ह्यातून लाखो भाविक या मंदिरात नेहमी दर्शनासाठी येत असतात.  

भाविकांबरोबर रांगेत उभं राहून आमदार सुरेश धस यांनी दर्शन घेतलं. सुरेश धस यांनी भाविकांसाठी शाबू खिचडीही तयार केली. सुरेश धस यांनी पुरातन काळातील महादेव मंदिरात हजर राहून महादेवाचं दर्शन घेतलं. तसंच भाविक भक्तांसाठी महाप्रसाद बनवला. आमदार सुरेश धस यांनी स्वतः खिचडी बनवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details