वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा - MAHASHIVRATRI 2026

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
प्रा. बाबासाहेब देशमुख आणि ऋषिकेश शिंदे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : February 15, 2026 at 2:51 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बीड : देशभरात रविवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी होत आहे. देशातील विविध महादेवाच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. महाशिवरात्र पर्वकाळात देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत भाविकांची मांदिआळी पाहायला मिळत आहे. वैद्यनाथ मंदिराला महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक अशी फुलाची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मध्यरात्री 12 पासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आले असून सायंकाळी 6 वाजता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा करण्यात येते. यावेळी प्रभूंना विविध दागिनं घातलं जातात. अलंकारिक पूजेच्या मनमोहक रूपानं भक्तांचे नेत्र दिपून जात आहे. वैद्यनाथाच्या स्पर्श दर्शनाचं अनन्यसाधारण महत्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त याच अलंकारिक पूजेतील देवाचं दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details