उमेदवारी नाकारल्यानं भाजपा नेते अमोल बालवडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश; पक्षानं दगाफटका केल्याचा आरोप - AMOL BALWADKAR ENTERS NCP
🎬 Watch Now: Feature Video

Published : December 31, 2025 at 8:27 AM IST
पुणे : महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळं राजकीय पक्षांनी इच्छुकांना एबी फॉर्म दिलेत. पण अनेक झालेल्या इच्छुकांनी विविध पक्षात प्रवेश केला आहे. पुण्यात भाजपाकडून उमेदवारी जाहीर न करता इच्छुकांना थेट एबी फॉर्म देण्यात आलेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपाकडून इच्छूक असलेल्या अमोल बालवडकर यांना उमेदवारी जाहीर न झाल्यानं मंगळवारी त्यांनी पक्षावर जोरदार टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. "विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्यानं मी माघार घेत एक लाखाच्या मताधिक्यानं चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं. त्यानंतर भाजपानं माझ्यासोबत दगाफटका केला. मला दोन दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐकलं असतं. मात्र ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजपा पक्षाचं नुकसान आहे," असं अमोल बालवडकर म्हणाले.