लातूरमध्ये चालकाच्या निष्काळजीपणामुळं शाळकरी मुलांची बस पलटी; 22 विद्यार्थी जखमी - शाळकरी मुलांची बस पलटी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
लातूरमध्ये शाळकरी मुलांची बस पलटी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : July 8, 2026 at 2:36 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

लातूर : राचन्नावाडी येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. यावेळी  सांडोळ-महांडोळ मार्गावर ही बस पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 22 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक समोर आली आहे. स्कूल बसचा नियमित चालक आळंदी वारीला गेला आहे. त्याच्या जागी त्यानं बदली चालक पाठवला होता. मात्र, बदली चालक दिल्याची माहिती शाळा प्रशासनाला दिली नव्हती, अशी चर्चा सुरू आहे. एमएच 12 पीक्यू 5120 ही स्कूल बस नेहमीप्रमाणं विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेली. यावेळी बदली चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होता. त्यामुळं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात 22 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चाकूर इथं दाखल केलं आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  

ABOUT THE AUTHOR

ETV Bharat Marathi’s extensive presence and commitment to showcase the diverse stories and happenings from all 36 districts of Maharashtra, cater to Marathi audience in India and elsewhere. Having a broad presence across the state allows us to capture a wide range of perspectives and experiences, contributing to a more comprehensive understanding of Marathi culture, traditions, and developments. The focus on creativity in storytelling adds depth and engagement to the news it serves and makes it more appealing to the audience....view details