...अशी साजरी केली मराठी रंगकर्मींनी धुळवड! संतोष जुवेकर, पुष्कर जोग अन् गौरव मोरे झाले सहभागी! - MARATHI ARTISTS HOLI 2026
🎬 Watch Now: Feature Video

Published : March 3, 2026 at 5:45 PM IST
मुंबई : अमेय खोपकर, अवधूत गुप्ते, अभिजीत पानसे, अवधूत वाडकर मंदार वाडकर, स्वप्निल बांदोडकर, अजित परब आणि निनाद बत्तिन यांनी 'रंगकर्मी धुळवड' २०२६ चे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मराठी सृष्टी एकवटलेली दिसली. रविकांत गायकवाड यांनी शास्त्रीय संगीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाला अनेक मराठी अभिनेता आणि अभिनेत्रींनी उपस्थिती लावली. यावेळी संगीतकार अनु मलिक यांनी गाणं गाऊन कलाकारांच मनोरंजन केलं. "दरवर्षीची धुळवड आमच्यासाठी महत्त्वाची असते. धुळवडनिमित्त आम्ही नेहमी धमाल करत असतो. आमची भेट होते, त्यामुळं आम्ही नेहमीच गेट-टुगेदरची वाट बघत असतो, अशी प्रतिक्रिया अभिनेता पुष्कर जोग यांनी दिली. "दरवर्षीप्रमाणं यंदाही सगळे एकत्र जमलेत. असे उपक्रम आयोजित करायला मला खूप आवडतं. धुळवडनिमित्त इतकीच इच्छा की, मराठीमध्ये बाहुबली सारखा मोठा चित्रपट बनावा," अशी प्रतिक्रिया अभिजीत पानसे यांनी दिली.