गटारी अमावस्या 2026 : आखाड जोरात, मटण-चिकन खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी, पाहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
माहिती देताना प्रतिनिधी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : August 12, 2026 at 1:44 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : आषाढ महिन्यामधील शेवटचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या याला 'गटारी अमावस्या' (Gatari Amavasya) म्हणूनही ओळखले जाते. गुरूवारपासून (13 ऑगस्ट) सर्वत्र श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. आज आखाडचा शेवटचा दिवस असल्यानं पुणेकरांनी मटण खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. पुण्यातील नवी पेठ येथील सोनाली मटण शॉप येथे पहाटे पासूनच मटण खरेदीला गर्दी झाली होती. सकाळपासून जवळपास 700 ते 800 किलोहून अधिक मटण विक्रीला गेलं असून नागरिकांनी पहाटे 5 वाजल्यापासून मटण खरेदीसाठी गर्दी केली होती. गेल्या काही वर्षांपासून आखाड पार्टी हा इव्हेंट झाला असून कुटुंबीय, मित्र-मंडळी, कार्यालयातील सहकारी यांच्यासोबत एकत्र येऊन मटण पार्टी केली जाते. यंदाही आज आखाडचा शेवटचा दिवस असल्यानं अनेक ठिकाणी आखाड पार्टी जोरात साजरी केली जाते. नागरिक ही तासंतास रांगते उभं राहून मटण खरेदी करत आहेत. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी, पाहूया...