पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गॅस टँकरचा अपघात; चालकाच्या धाडसाने अनर्थ टळला - GAS TANKER ACCIDEN

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गॅस टँकरचा अपघात (ETV Bharat via Eye witness)

By ETV Bharat Marathi Team

Published : February 23, 2026 at 7:48 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा गॅस टँकरचा अपघात घडल्यानं काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सकाळी सुमारे दहाच्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ अपघात घडला. अचानकपणे टँकरचा ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र चालकानं प्रसंगावधान राखत मोठा अनर्थ टाळला. समोर मोठी वाहतूक आणि उताराचा रस्ता असल्याने धोका अधिक वाढला होता. परिस्थितीचं गांभिर्य ओळखून चालकानं टँकर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराला धडकवला. सुदैवाने टँकर पलटला नाही आणि गॅस गळतीही झाली नाही. त्यामुळे संभाव्य स्फोट किंवा मोठ्या दुर्घटनेचा धोका टळला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि संबंधित प्रशासनानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही मिनिटांतच बचावकार्य सुरू करण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टीनं त्या मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने टँकर सुरक्षितरित्या बाजूला घेण्यात आला. आपत्कालीन पथकानं संपूर्ण परिसराची तपासणी करून गॅस गळती नसल्याची खात्री केली. त्यामुळे मार्गावरील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ABOUT THE AUTHOR

...view details