"साईबाबा सर्व मनोकामना पूर्ण करतात"- सलग दुसऱ्या दिवशी दर्शनानंतर अभिनेत्री ज्योतिकाची भावना - JYOTHIKA SARAVANAN SHIRDI DARSHAN

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
ज्योतिका सरवननं साई मंदिरात घेतलं साईंचं दर्शन (Source ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : December 5, 2025 at 11:32 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी (अहिल्यानगर) - दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रमुख आणि लोकप्रिय अभिनेत्री ज्योतिका सरवनननं शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना तिनं सांगितलं की, साईबाबांचं दर्शन घेऊन मनाला अत्यंत समाधान मिळालं. मी गेल्या तीन वर्षांपासून नियमितपणे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत आहे. येथे आल्यावर मन शांत होतं. साईबाबा सर्व मनोकामना पूर्ण करतात, असे तिनं दर्शन घेतल्यानंतर सांगितलं. दक्षिणेतील सुपरस्टार सूर्या सरवनन शिवकुमार यांच्या पत्नी असलेल्या ज्योतिका ही केवळ अभिनेत्री नसून चित्रपट निर्माती आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणूनही ओळखली जाते. तिनं तमिळ, तेलुगू आणि काही हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. ज्योतिकानं गुरुवारी रात्रीही शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं होतं. तिनं साईबाबांच्या गुरुवारी रात्रीच्या शेजाआरतीला हजेरी लावली होती. साई दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी साई शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन ज्योतिका यांचा सत्कार केला. यावेळी साई मंदिर प्रमुख, जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आणि प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details