'गण गण गणात बोते'चा गजर करत नववर्षाचं स्वागत; संतनगरी शेगावात भाविकांची गर्दी; पाहा व्हिडिओ - SANT GAJANAN MAHARAJ TEMPLE
🎬 Watch Now: Feature Video

Published : January 1, 2026 at 4:34 PM IST
बुलढाणा : शेगाव हे 'विदर्भाची पंढरी' म्हणून ओळखलं जातं. इथे श्री संत गजानन महाराजांची समाधी आहे. ग्रेगरियन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (1 जानेवारी 2026) देशभरातून हजारो भाविक शेगावला दाखल झाले आहेत. नवीन वर्षाची सुरुवात महाराजांच्या आशीर्वादाने आणि दर्शनाने करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. आज महाराष्ट्रासह इतर राज्यांतून भाविक दर्शनासाठी शेगावात दाखल झाले आहेत. शेगावसह शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर या तीर्थक्षेत्र येथेही भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. शेगावमध्ये श्री गजानन महाराजांच्या भक्तांची संख्या लक्षणीय आहे. 'गण गण गणात बोते'च्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेलाय. श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने रात्रभर मंदिर खुलं ठेवलं, जेणेकरून भाविकांना सोयीस्करपणे दर्शन घेता येईल. आज सकाळपासून तर गर्दीनं उच्चांक गाठला आहे. तर "महाराजांच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात केली. आम्ही दरवर्षी येतो. येथे येऊन मनाला शांती मिळते. महाराज आमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, गजानन मंदिरात आलं की प्रसन्न वाटतं, अशी भावना भाविक नंदिनी कळमकर यांनी व्यक्त केली.