दौंडमध्ये सिमेंट वाहतुकीच्या वादातून थरार; पाटसमध्ये दोन गटात हाणामारीनंतर गोळीबार, वरिष्ठ पोलिसांची धाव! - DAUND PATAS FIRING INCIDENT

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
प्रतिक्रिया देताना अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : June 5, 2026 at 8:28 PM IST

|

Updated : June 5, 2026 at 8:48 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

दौंड : तालुक्यातील पाटस इथं दुपारी गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. दोन गटात झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीमध्ये झालं. यानंतर हाणामारीतून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळं स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाटसमधील कंपनीमध्ये सिमेंट वाहतुकीच्या कारणावरून परिसरातील व्यक्तींमध्ये वाद झाला. यानंतर दोन्ही गटांमध्ये गटांमध्ये जोरदार मारामारी झाली. हाणामारीचं रुपांतर गोळीबारात झालं. यावेळी दोन ते तीन राऊंड यावेळी फायर करण्यात आले. त्यापैकी एक गोळी तिथं उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला लागली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या घटनेबाबत माहिती मिळतात यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून येथील गर्दी पांगवण्यात आली. या घटनेनंतर पाटस पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत या हाणामारी आणि गोळीबारीच्या घटनेतील संशयित आरोपींना ताब्यात घेतले. एकूण आठ जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले की, सिमेंटच्या वाहतुकीच्या कारणावरून कडू आणि कोरटकार या दोन गटांमध्ये वाद झाला. दोन्ही गटांनी काही युवक आपल्यासोबत या वादामध्ये आणलेले होते. त्याच्यात एका गटाने दुसऱ्या गटावर फायरिंग केल्याची माहिती आहे.

या घटनेत दहा ते बारा लोक दोन्ही गटाचे मिळून समाविष्ट असल्याचं सीसीटीव्हीच्या फुटेजवरून दिसून आले आहे. दोन खाली बुलेट केस पोलिसांना घटनास्थळावरून मिळाल्या आहेत. यावरून अंदाज लावता येतो की दोन फायर झाल्याची शक्यता आहे.

शुक्रवारी दुपारी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाटस या ठिकाणीही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या घटनेतील एकूण आठ जे युवक आहेत त्यांना पोलिसांनी तातडीने कारवाई करून ताब्यात घेतले आहे. त्यांची मेडिकल चाचणी करणे सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेत अद्यापपर्यंत कोणी जखमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखीही काही युवकांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. त्यांना ताब्यात घेण्यात येईल या अनुषंगाने गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सर्व आरोपींना अटक करण्याची कारवाई केली जाईल आणि पुढील तपास सुरु आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.

पाटस परिसरातील एका कंपनीतील सिमेंट वाहतुकीवरुन ही भांडणे झाले असल्याची माहिती समोर येत आहे. पाटस परिसरामध्ये असलेल्या कंपन्यांमुळे अनेकदा वादाचे प्रकार आणि गंभीर स्वरूपाचे हाणामारीचे प्रकार देखील घडत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाटस परिसरात या कंपन्यांमुळे आणि ठेकेदारीमुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावणे हे पोलीस प्रशासनासाठी मोठे आव्हान असणार आहे.

Last Updated : June 5, 2026 at 8:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

ETV Bharat Marathi’s extensive presence and commitment to showcase the diverse stories and happenings from all 36 districts of Maharashtra, cater to Marathi audience in India and elsewhere. Having a broad presence across the state allows us to capture a wide range of perspectives and experiences, contributing to a more comprehensive understanding of Marathi culture, traditions, and developments. The focus on creativity in storytelling adds depth and engagement to the news it serves and makes it more appealing to the audience....view details