कोस्टल रोडवरील बोगद्यात कारला भीषण आग; वाहतूक ठप्प, पाहा व्हिडिओ - कारला भीषण आग

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
कोस्टल रोडवरील बोगद्यात कारला भीषण आग (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : July 15, 2026 at 3:50 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) बोगद्यात एका कारने पेट (Car catches fire) घेतल्याची घटना घडली. त्यामुळं बोगद्यातील वाहतूक पूर्ण ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या आणि स्थानिक पोलिसांचं एक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालं. मात्र आग वाढतच गेल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी थोडावेळ बंद करण्यात आला. कोस्टल रोडच्या बोगद्यात कारने पेट घेतल्यानंतर आगीचे आणि धुराचे लोट पसरले. त्यामुळं काही वेळातच बोगदा धुराने कोंडला गेला. वाहतूक सुरू असतानाच अचानक घडलेल्या या घटनेनं लोक घाबरले. कारण बोगद्यात धुरामुळं लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसंच आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.