कॉक्रोच जनता पार्टीच्या आवाहनानंतर 'जेन अल्फा' रस्त्यावर, पाण्याच्या बाटलीला माईक बनवून प्रशासनाचं वेधलं लक्ष

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
गंगापूर तालुक्यात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळं विद्यार्थ्यांचे हाल (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : August 14, 2026 at 6:57 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात 'जेंझी' युवकांची ताकद रस्त्यावर आलेली पाहायला मिळाली. त्यांनी पेपरफुटीबाबत आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी ग्रामीण भागातील शाळांची दुरवस्था समाज माध्यमांवर मांडण्याचं आवाहन केलं आणि अनेक ठिकाणी जेंझीच्या पुढची पिढी म्हणजेच 'जेन अल्फा'नं समाज माध्यमांवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांवर आपल्या व्यथा स्वतः मांडायला सुरुवात केली असून, तसे काही व्हिडिओ चांगलेच चर्चेत आहेत. काही व्हिडिओ कॉक्रोच जनता पार्टीनं आपल्या समाज माध्यम पेजवर देखील टाकून शैक्षणिक समस्यांना वाचा फोडली आहे. अशातच जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद-घाणेगाव रस्त्याची पावसामुळे अक्षरशः दुरवस्था झालीय. चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळं नागरिकांना या मार्गावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यानं दररोज शेकडो शेतकरी आणि कामगार याच रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र, सर्वाधिक हाल होत आहेत ते तुर्काबाद येथील वाडी-वस्तीवरील शाळकरी मुलांचे. आपली व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या मुलांनी चक्क पाण्याच्या बाटलीलाच ‘माईक’ बनवत रस्त्याची दुरवस्था मांडली. विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ आता चर्चेचा विषय ठरत असून, प्रशासनाने या रस्त्याची तातडीनं पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.