आदिवासी आश्रमशाळांचे नियमित निरीक्षण आणि एसओपी पालन अनिवार्य; दोषींचं होणार निलंबन :चंद्रशेखर बावनकुळे
🎬 Watch Now: Feature Video

Published : August 13, 2026 at 9:55 PM IST
पुणे : गडचिरोली येथील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापानं दंश केल्यानं तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेने राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. आज याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. "काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विकास मंत्री आणि सर्व संबंधित मंत्र्यांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले आहेत. आश्रमशाळा व वसतिगृहे चालवण्यासाठी ठरवून दिलेल्या एसओपीच तंतोतंत पालन न करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, गडचिरोलीतील आश्रमशाळेत घडलेल्या दुर्दैवी घटनेची सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असून, स्वतः आदिवासी विकास मंत्री घटनास्थळी गेले आहेत. तसेच जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्यापासून ते संस्थेची मान्यता परवाना रद्द करण्यापर्यंतचे कठोर निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. तसेच भविष्यात कोणत्याही आश्रमशाळेत अशा प्रकारची दुर्दैवी दुर्घटना किंवा विद्यार्थ्यांचा मृत्यू होणार नाही याची दखल देखील घेण्यात आली आहे.