ब्रह्मश्री छगंती काटेश्वर रावगिरी महाराजांचे कीर्तन उत्साहात - TELUGU ASSOCIATION OF MAHARASHTRA
🎬 Watch Now: Feature Video

Published : March 15, 2026 at 2:31 PM IST
मुंबई : चेंबूर इथं 'फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' यांच्यातर्फे ब्रह्मश्री छगंती काटेश्वर रावगिरी महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलं होतं. तेलुगू भाषेत यावेळी महाराजांनी व्याख्यान दिलंय. 'भक्ती पुरुषारदामुलु' हा या कीर्तनाचा मूळ विषय होता. व्याख्यानाविषयी सांगताना 'फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र'चे अध्यक्ष जगदबाबू गंजी म्हणाले की, "महाराष्ट्रात सुमारे एक कोटी तेलुगू भाषिक लोक राहतात. तेलुगू आणि मराठी संस्कृतीचा संबंध अतिशय घनिष्ठ आहे. आमच्यासाठी तेलुगू ही आई तर मराठी ही मावशी आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून तेलुगू समाज महाराष्ट्रात सक्रिय आहे." ब्रह्मश्री छगंती काटेश्वर रावगिरी महाराज यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, "ब्रह्मश्री छगंती काटेश्वर रावगिरी महाराज हे आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागार आणि प्रसिद्ध आध्यात्मिक वक्ते आहेत. यांचा दोन दिवस मुंबईत कार्यक्रम झाला. शनिवारी ऐरोली इथं तर रविवारी चेंबूर इथं हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमात 'सिताराम कल्याणम' आणि 'भक्ती पुरुषांथम' या विषयांवर प्रवचन झालं.