सोनिया गांधींच्या ‘त्या’ व्हिडिओवरून रायगडमध्ये भाजपा आक्रमक; मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको!

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
रायगडमध्ये सोनिया गांधींच्या विरोधात भाजपाचे आंदोलन (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : August 16, 2026 at 8:52 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

रायगड : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’च्या गायनावरून देशभरात राजकीय वातावरण तापलं असताना रायगडमध्येही भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सोनिया गांधी यांनी राष्ट्रगीताचा कथित अपमान केल्याचा आरोप करत भाजपाच्या वतीनं माणगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी सोनिया गांधींच्या कथित भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला. भाजपाच्या आरोपानुसार, संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायनाबाबत सोनिया गांधी यांनी आक्षेप घेतला. मात्र, काँग्रेसनं हे आरोप फेटाळून लावत सोनिया गांधी यांचा उद्देश गायन थांबवण्याचा नसून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था करण्याचा होता, असं स्पष्टीकरण दिलंय. भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत सोनिया गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या कथित भूमिकेचा निषेध केला. या आंदोलनामुळं महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. सोनिया गांधींनी देशाच्या राष्ट्रीय भावनांचा सन्मान करावा, अशी मागणी करत भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळं आता स्थानिक पातळीवरही राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय.