'ज्ञानोबा-तुकाराम' चा पुण्यात जयघोष; संत ज्ञानेश्वरांसह संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात स्वागत - SANT DNYANESHWAR MAHARAJ PALKHI
🎬 Watch Now: Feature Video

Published : July 10, 2026 at 1:13 PM IST
पुणे : आषाढातील रिमझिम सरी, टाळ-मृदुंगाचा अखंड निनाद, भगव्या पताकांनी दुमदुमलेले रस्ते आणि लाखो कंठातून घुमणारा 'ज्ञानोबा-तुकाराम' चा जयघोष… अशा भक्तिमय वातावरणात पुणे शहरानं आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे उत्स्फूर्त, भव्य आणि भावपूर्ण स्वागत केलं आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात आगमन झाले. दोन्ही पालख्या दोन दिवस पुण्यात मुक्कामी असणार आहेत. पण, गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसानं प्रशासनाकडून वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे महानगरपालिकेकडून दिंड्या उतरतात त्या 101 शाळांमध्ये वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अवघे पुणे शहर विठ्ठलमय झालं असताना वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता आणि सेवाभावाच्या परंपरेचे पुणेकरांनी जल्लोषात स्वागत केले. या पालखी सोहळ्याचे ड्रोन व्हिडीओ पाहूया...