अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारी आधीच येणार - मुरलीधर मोहोळ - MURALIDHAR MOHOL
🎬 Watch Now: Feature Video

Published : February 22, 2026 at 7:25 PM IST
पुणे : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, या विमान अपघाताबाबत अजूनही कोणताही अहवाल आलेला नाही. याबाबत प्रसारमाध्यमांनी आज (22 फेब्रुवारी) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना विचारलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "अजित पवार पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारी आधीच येणार आहे. अजित पवार यांच्याविषयी दोन दिवसांपूर्वी नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट स्वरुपात प्रसिद्धीपत्रक दिलं आहे. त्यात खुलासा देण्यात आला आहे. त्यामुळं मला कोण काय म्हणतंय? यात जायचं नाही. आमच्या खात्यातील तपास यंत्रणा वेळोवेळी तपास करत असून याबद्दल माहिती दिली जात आहे. जे आरोप करत आहेत, त्यांनी योग्य ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडलं आहे आणि जे काय आहे, ते सगळ्यांच्या समोर येईल," असंही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.