धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात १.५५ कोटींचा महाघोटाळा, 4 सरकारी कर्मचाऱ्यांना अटक - 1 CRORE 55 LAKH SCAM

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
माहिती देताना पोलीस अधिकारी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : July 2, 2026 at 7:57 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

धुळे - पोलीस प्रशिक्षण केंद्रात (पीटीसी) 1 कोटी 55 लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार उघडकीस आला असून, याप्रकरणी शहर पोलिसांनी चौघा लोकसेवकांना बेड्या ठोकल्या आहेत. या खळबळजनक महाघोटाळ्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. डिसेंबर 2024 ते एप्रिल 2026 दरम्यान आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपीक मनोजगिर बुवा, जगदीश सोनवणे, असई नरेशगिर गोसावी आणि पोहेकॉ. मनोज खोंडे यांनी संगनमत केले. वेतनात कोणतेही बेसिक ऍरियर्स देय नसताना, ऑनलाईन 'सेवार्थ' प्रणालीत परस्पर वाढ करून तब्बल 1 कोटी 55 लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळवले आणि याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच 1 जुलै रोजी रात्री चौघांना अटक करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी शासनाचा विश्वासघात केला. शासकीय तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या या टोळीचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

ETV Bharat Marathi’s extensive presence and commitment to showcase the diverse stories and happenings from all 36 districts of Maharashtra, cater to Marathi audience in India and elsewhere. Having a broad presence across the state allows us to capture a wide range of perspectives and experiences, contributing to a more comprehensive understanding of Marathi culture, traditions, and developments. The focus on creativity in storytelling adds depth and engagement to the news it serves and makes it more appealing to the audience....view details