Xiaomi Pad 8 भारतात लॉंच : Snapdragon 8s Gen 4 सोबत शक्तिशाली टॅबलेट
शाओमीनं भारतात आपला नवीनतम फ्लॅगशिप अँड्रॉइड टॅबलेट Xiaomi Pad 8 लॉंच केला.

Published : March 10, 2026 at 12:08 PM IST
मुंबई : शाओमीनं भारतात आपला नवीनतम फ्लॅगशिप अँड्रॉइड टॅबलेट Xiaomi Pad 8 लॉंच केला. हा टॅबलेट 11.2 इंच 3.2K डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर आणि 9,200mAh बॅटरीसह येतो. लॉंच ऑफर्ससह याची किंमत 30,999 पासून सुरू होते. Dolby Vision, Dolby Atmos, HyperOS 3 (Android 16 वर आधारित) आणि AI फीचर्ससह हे प्रोडक्टिव्हिटी आणि एंटरटेनमेंटसाठी उत्तम पर्याय आहे.

डिस्प्ले आणि डिझाइन
Xiaomi Pad 8 मध्ये 11.2 इंच LCD स्क्रीन आहे जी 3200x 2136 रेझोल्यूशन, 3:2 आस्पेक्ट रेशियो, 144Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि 800 nits पीक ब्राइटनेस देते. Dolby Vision, HDR10, true DC dimming, 12-बिट कलर आणि TÜV Rheinland लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह डिस्प्ले उत्कृष्ट आहे. ऑप्शनल नॅनो टेक्स्चर कोटिंग उपलब्ध आहे, जी ग्लेअर कमी करते. टॅबलेट 5.75-5.8 mm जाड आणि सुमारे 485-494 ग्रॅम वजनाचा आहे, ज्यामुळं ते पोर्टेबल आणि प्रीमियम फील देतो. Graphite Grey आणि Titanium Blue कलर ऑप्शन्समध्ये तो उपलब्ध आहे.

परफॉर्मन्स
टॅबलेट Snapdragon 8s Gen 4 चिपसेटद्वारे पावर्ड आहे, जे हाय परफॉर्मन्स देतो. Xiaomi HyperOS 3 (Android 16 आधारित) AI फीचर्स, क्रॉस-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आणि PC-ग्रेड WPS, CAD सपोर्ट देते. स्टायलस (Xiaomi Focus Touch Pen Pro), मॅग्नेटिक कीबोर्ड आणि फ्लिकर/कलर-टेम्परेचर सेन्सरसह प्रोडक्टिव्हिटी वाढवते.
बॅटरी, कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी
9,200mAh बॅटरी 45W फास्ट चार्जिंगसह येते आणि बॉक्समध्ये 67W चार्जर मिळतो. फ्रंट 8MP आणि रियर 13MP कॅमेरा आहे. चार स्पीकर्स, चार मायक्रोफोन्स, Wi-Fi 7, USB-C 3.2 Gen 1, NFC आणि IR ब्लास्टर फीचर्स आहेत. Dolby Atmos ऑडिओ अनुभव यात मिळेल.

किंमत आणि उपलब्धता
- 8GB+128GB: 33,999
- 12GB+256GB:36,999 (नॅनो टेक्स्चर: 38,999)
- 12GB+512GB:41,999 (नॅनो टेक्स्चर: 43,999)
लॉंच ऑफर्स (31 मार्चपर्यंत)
SBI क्रेडिट कार्ड EMI वर 3,000 इन्स्टंट डिस्काउंट, एक वर्ष अतिरिक्त वॉरंटी मिळेल. त्यामुळं सुवातीची प्रभावी किंमत 30,999 रुपये होईल.
अॅक्सेसरीज: कव्हर 1,499, कीबोर्ड 4,999, Focus Pen Pro 5,999, Focus कीबोर्ड 8,999 ला खरेदी करता येईल.
17 मार्चपासून Amazon, Xiaomi ऑनलाइन/ऑफलाइन स्टोअर्स आणि पार्टनर स्टोअर्समध्ये या टॅबलेटची विक्री सुरू होईल.

Xiaomi Pad 8 हा प्रीमियम टॅबलेट सेगमेंटमध्ये मजबूत स्पर्धा करेल. हा टॅबलेट विशेषतः हाय-एंड परफॉर्मन्स आणि फीचर्ससाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
हे वाचलंत का :

