Xiaomi 17, Xiaomi 17 Ultra आणि Xiaomi Pad 8 : 28 फेब्रुवारीला होणार भारतात लॉंच
Xiaomi 17, Xiaomi 17 Ultra आणि Xiaomi Pad 8 भारतात Leica कॅमेरा, Snapdragon 8 Elite आणि आकर्षक ऑफर्ससह लॉंच होणार आहेत.

Published : February 23, 2026 at 11:57 AM IST
|Updated : February 23, 2026 at 1:11 PM IST
मुंबई : Xiaomi नं आपल्या नवीन फ्लॅगशिप सिरीजची भारतातील लॉंच तारीख जाहीर केलीय. Xiaomi 17, Xiaomi 17 Ultra आणि Xiaomi Pad 8, 28 फेब्रुवारी 2026 रोजी भारतात लॉंच होतील. हे फोन चीनमध्ये आधीच लॉंच झाले असून, आता जागतिक बाजारपेठेत येणार आहेत. Xiaomi नं अधिकृत मायक्रोसाइटवरून हे स्पष्ट केलं की, लाइव्हस्ट्रीम दुपारी 2 वाजता (बार्सिलोना वेळेनुसार) सुरू होईल, जे भारतात संध्याकाळी 6:30 वाजता दिसेल. कंपनीनं "The New Wave of Imagery" ही टॅगलाइन दिली असून, कॅमेरा फीचर्सवर विशेष भर देण्यात आला आहे.
✅ Officially confirmed :
— Debayan Roy (Gadgetsdata) (@Gadgetsdata) February 23, 2026
Xiaomi 17 , Xiaomi 17 Ultra and Xiaomi Pad 8 India 🇮🇳 launch : February 28th ✅
Globally, they're bringing some more products like :
✅ Xiaomi Watch 5
✅ Xiaomi Tag
✅ Xiaomi 5000mAh⚡15W ultra-slim magnetic power bank
✅ Xiaomi Buds 8 Pro pic.twitter.com/ekrjXH6kKP
Xiaomi 17 सिरीज लॉंच
Xiaomi 17, Xiaomi 17 Ultra हे दोन मुख्य मॉडेल्स जागतिक स्तरावर लॉंच होत आहेत. चीनमध्ये Xiaomi 17 सप्टेंबर 2025 मध्ये प्रो आणि प्रो मॅक्ससह लॉंच झाला होता, तर अल्ट्रा डिसेंबरमध्ये लॉंच झाला होता. जागतिक व्हर्जनमध्ये अल्ट्रा मॉडेल स्टाररी ग्रीन रंगात टीझरमध्ये दिसत आहे. भारतातही हे दोन्ही फोन 28 फेब्रुवारीला उपलब्ध होतील, ज्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. शियाओमी इंडियानं सोशल मीडियावर आणि वेबसाइटवर याबाबत टीझर जारी केला आहे.
किंमत आणि कॉन्फिगरेशन
जागतिक बाजारात शियाओमी 17 चं बेस व्हेरिएंट (12GB RAM + 256GB स्टोरेज) EUR 999 (सुमारे 1,07,000 रुपये) असण्याची शक्यता आहे. 12GB + 512GB व्हेरिएंट EUR 1,099 (सुमारे 1,18,000₹) पर्यंत जाऊ शकतं. हे ब्लॅक, ग्रीन, ब्लू आणि पिंक रंगांमध्ये येईल. शियाओमी 17 अल्ट्रा 16GB + 512GB साठी EUR 1,499(सुमारे 1,61,000₹) आणि 16GB + 1TB साठी EUR 1,699(सुमारे 1,83,000₹) ला असू शकतं. हे ब्लॅक, व्हाइट आणि ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध होईल. भारतात अपेक्षित किंमत शियाओमी 17 साठी सुमारे 80,000 आणि अल्ट्रा साठी 1,25,000 असू शकते. ही किंमत मागील मॉडेल्सपेक्षा (64,999 आणि 1,09,999)रुपयांपेक्षा जास्त असू शकते, परंतु जागतिक स्तरावर किंमत वाढलेली नाही.
खास ऑफर्स आणि फायदे
लॉंचनंतर खरेदीदारांना 24 महिन्यांचा "क्वालिटी अॅश्युरन्स प्लॅन" मिळेल. पहिल्या 6 महिन्यांत एक मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट आणि वॉरंटी कालावधीत लेबर चार्जेसशिवाय आउट-ऑफ-वॉरंटी रिपेअर सुविधा उपलब्ध असेल. हे ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा देईल.
Xiaomi Pad 8
Xiaomi पॅड 8 हा टॅबलेटही 28 फेब्रुवारीला भारतात लॉंच होईल. चीनमध्ये 2025 मध्ये आलेला हा टॅबलेट 11.2 इंच 3.2K 144Hz LCD डिस्प्ले, Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर, 13MP रियर आणि 8MP फ्रंट कॅमेरा, 9200mAh बॅटरीसह 45W चार्जिंग, HyperOS 3 आणि क्वाड स्पीकर्ससह येईल.
Xiaomi 17 सिरीज
Xiaomi 17 सिरीज Leica सह कॅमेरा ऑप्टिक्स, Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आणि प्रीमियम फीचर्ससह येणार आहे. हे फोन आणि टॅबलेट प्री-बुकिंगसाठी Amazon वर उपलब्ध असतील. तुम्ही देखील 28 फेब्रुवारीला लाइव्हस्ट्रीम कंपनीच्या YouTube वर पाहू शकता.
हे वाचलंत का :

