भारतात कुठं दिसणार पूर्ण चंद्रग्रहण?, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
2026 रोजी वर्षातील पहिलं पूर्ण चंद्रग्रहण (lunar eclipse ) मार्चमध्ये होणार आहे. हे ग्रहण भारतात कुठं आणि कसं पाहयाचं चला जाणून घेऊया....

Published : February 25, 2026 at 3:50 PM IST
मुंबई : वर्षातील पहिलं पूर्ण चंद्रग्रहण (Total Lunar Eclipse) 3 मार्च 2026 रोजी होणार आहे. हे ग्रहण जगभरातील अनेक भागांत दिसेल. तुम्ही उघड्या डोळ्यांनी देखील हे ग्रहण पाहू शकता. चंद्र पृथ्वीच्या सावलीत येतो तेव्हा, तो लालसर रंगाचा (Blood Moon) दिसतो, ज्यामुळं हा अनुभव अविस्मरणीय ठरतो. भारतात हे ग्रहण संपूर्ण दिसणार नाही, पण संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी त्याचा शेवटचा भाग नक्की दिसेल. उत्तर-पूर्व भारतातील काही शहरांत पूर्ण ग्रहण (March 2026 Total Lunar Eclipse) अनुभवता येईल.
चंद्रग्रहण कसं होतं?
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होतं. कारण पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळं चंद्रचा प्रकाश मंद होतो आणि चंद्र लाल रंगाचा दिसतो. हा लाल रंग "ब्लड मून" म्हणून प्रसिद्ध आहे, कारण सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून फिल्टर होऊन चंद्रावर पोहचतो.
भारतातील चंद्रग्रहणाची वेळ (IST)
Time and Date वेबसाइटनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) ग्रहणाची वेळ खालीलप्रमाणे आहे.
- पेनम्ब्रल फेजची सुरुवात: सायंकाळी 4:58 वाजता
- टोटॅलिटीची सुरुवात: सायंकाळी 4:58 वाजता
- टोटॅलिटीचा शेवट: सायंकाळी 5:32 वाजता
- पेनम्ब्रल फेजचा शेवट: सायंकाळी 7:53 वाजता
भारताच्या बहुतांश भागात चंद्र ग्रहणादरम्यान उगवत असेल. म्हणजे, अधिकांश लोकांना फक्त ग्रहणाचा शेवटचा भाग दिसेल. हा सुमारे 20 मिनिटांचा अनुभव असेल. तुम्ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पूर्व दिशेकडं पाहून याचा आनंद घेऊ शकता.
शहरनिहाय दृश्यता
भारतातील बहुतांश शहरांत (जसं दिल्ली, मुंबई, कोलकाता) फक्त आंशिक ग्रहण चंद्रोदयाच्या वेळी दिसेल. मात्र, उत्तर-पूर्व भारतातील काही शहरांत पूर्ण ग्रहण (100% obscuration) दिसेल. या भागांत चंद्रावर दुपारपासून पृथ्वीची सावलीत पडेल आणि संध्याकाळपर्यंत पूर्ण ग्रहण अनुभवता येईल.
पूर्ण ग्रहण दिसणारी प्रमुख शहरे
- दिब्रुगढ, आसाम
- दिस्पूर, आसाम
- गुवाहाटी, आसाम
- इतानगर, अरुणाचल प्रदेश
- शिलाँग, मेघालय
या शहरांत अधिकतम ग्रहण सुमारे 5:10 ते 5:25 वाजता असेल.
चंद्रग्रहण कसं पाहावं?
चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणतीही विशेष साधनं लागत नाहीत. सौरग्रहणाप्रमाणे विशेष चष्म्याची गरज नाही. फक्त पूर्व क्षितिज स्पष्ट दिसेल अशी जागा शोधा. आकाश स्वच्छ असल्यास चंद्राचा रंग आणि उजेडातील बदल सहज दिसतील. बायनॉक्युलर किंवा दूरबीन असल्यास अधिक चांगला अनुभव मिळेल.
हे वाचलंत का :

