विवो X300 अल्ट्रा आणि X300 FE भारतात लाँच: फोटोग्राफी प्रेमींसाठी शक्तिशाली पर्याय
विवोनं आज भारतात विवो X300 अल्ट्रा आणि X300 FE लाँच केले. 200MP कॅमेरा आणि टॉप स्पेसिफिकेशन्ससह अल्ट्रा प्रीमियम तर FE परवडणारा फ्लॅगशिप अनुभव देतो.

Published : May 6, 2026 at 3:01 PM IST
मुंबई :विवो कंपनीनं आज भारतात आपल्या X300 सीरीजचे दोन शक्तिशाली स्मार्टफोन लॉंच केले आहेत. यात X300 Ultra हा पहिला Ultra ब्रँडेड फोन आहे, जो थेट भारतात उपलब्ध झाला आहे. यापूर्वी Ultra मॉडेल्स केवळ चीनपुरतंच मर्यादित होतं. X300 Ultra सोबतच कॉम्पॅक्ट X300 FE देखील लॉंच झाला आहे. दोन्ही फोन प्रीमियम डिझाइन, प्रोफेशनल कॅमेरा सिस्टम आणि शक्तिशाली परफॉर्मन्ससह बाजारात दाखल झाले आहेत. फोटोग्राफी प्रेमींसाठी हे फोन खासकरून आकर्षक ठरतील, अशी शक्यता आहे. या दोन्ही फोनचे वैशिष्ट्ये, किंमत, कॅमेरा तपशील आपण जाणून घेणार आहोत.

- X300 Ultra
X300 Ultra ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची प्रोफेशनल कॅमेरा सिस्टम. मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सल Sony LYT-901 सेन्सरचा आहे. यात f/1.9 अपर्चर, जिम्बल-स्टाइल ऑप्टिकल स्टॅबिलायझेशन आणि 1/1.12 इंच सेन्सर साइज आहे. यामुळं कमी प्रकाशातही उत्तम फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करता येतात. दुसरा 200मेगापिक्सल Samsung HPO पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स 85mm समतुल्य फोकल लेंथसह 3.7x ऑप्टिकल झूम देतो. याला मॅक्रो सपोर्टही मिळालेला आहे. 50 मेगापिक्सल Sony LYT-818 अल्ट्रावाइड लेन्स आणि 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा यामुळं पूर्ण पॅकेज यात मिळतं.
ZEISS Telephoto Extenders : विवोनं दोन क्लिप-ऑन लेन्स आणले आहेत. Gen 2 लेन्स 200mm समतुल्य रीच देते, तर Gen 2 Ultra 400mm पर्यंत जाते. हे केवळ डिजिटल झूम नाही तर वास्तविक काचेचे ऑप्टिकल एक्सटेंडर्स आहेत जे टेलिफोटो लेन्सवर बसवता येतात. फोटोग्राफर्ससाठी ही वैशिष्ट्ये खूप उपयुक्त ठरतील.
डिस्प्ले आणि परफॉर्मन्स : X300 Ultra मध्ये 6.82 इंच LTPO OLED डिस्प्ले असून रिझोल्यूशन 1440 x 3168 आहे. यात 144Hz अॅडाप्टिव रिफ्रेश रेट मिळतो. Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर, 12GB किंवा 16GB LPDDR5X RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. 5,800mm² व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम गेमिंग आणि हेवी टास्किंग दरम्यान फोनला थंड ठेवतं.
बॅटरी आणि सॉफ्टवेअर : 6,600mAh बॅटरी 100W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोन Android 16 वर आधारित OriginOS 6 वर चालतो. पाच वर्ष Android OS अपग्रेड्स आणि सात वर्ष सुरक्षा अपडेट्सची हमी देण्यात आली आहे. फोनचं वजन 232-237 ग्रॅम आणि जाडी 8.2mm आहे. हा फोन भारतात Victory Green आणि Eclipse Black रंगात उपलब्ध आहे.
किंमत आणि उपलब्धता : X300 Ultra हा फोन एकाच व्हेरिएंटमध्ये (16GB/512GB ) येतो. याची किंमत 1,59,999 आहे. 24 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI वर 6,667 प्रतिमाहसह फोन खरेदी करता येईल.ZEISS Imaging Grip Kit 11,999 आणि 400mm Teleconverter Gen 2 Ultra 27,999 ला मिळेल. पूर्ण कॉम्बो (फोन + 400mm लेन्स + Grip) 1,95,997 ला मिळेल. Photographer Kit (दोन्ही लेन्सेससह)2,09,999 मध्ये उपलब्ध आहे.
बँक ऑफर्स : बँक ऑफर्समध्ये 10% इन्स्टंट कॅशबॅक, HDFC/SBI/Axis वर 10% डिस्काउंट, एक वर्ष वॉरंटी एक्सटेंशन, V-Shield स्क्रीन प्रोटेक्शन आणि 60% असुरर्ड बायबॅक सारख्या योजना आहेत. Jio 5,000GB क्लाउड स्टोरेज 18 महिने फ्री मिळेल. प्री-बुकिंग 6 मे ते 13 मे 2026 पर्यंत चालेल.

- विवो X300 FE
X300 FE हा हातात आरामात बसणारा 6.31 इंच 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले असलेला फोन आहे. हा फोन 1230Hz रिफ्रेश रेट आणि 5,000 निट्स पीक ब्राइटनेस देतो. तो IP68 आणि IP69 रेटिंगमुळं पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. हा फोन भारतात Urban Olive (भारत एक्सक्लुझिव), Lilac Purple आणि Noir Black रंगात उपलब्ध आहे.

परफॉर्मन्स आणि बॅटरी : X300 FE, Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर, 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह येतो. फोनला पॉवर देण्यासाठी 6,500mAh ची बॅटरी यात मिळते. बॅटरी कॉम्पॅक्ट आकारात असूनही 80W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
X300 FE कॅमेरा : X300 FE मध्ये ZEISS सह को-इंजिनिअर्ड ट्रिपल कॅमेरा आहे. 50MP Sony IMX-921 मुख्य, 50MP 3x टेलिफोटो आणि 8MP अल्ट्रावाइड, 50MP फ्रंट कॅमेरा यात मिळेल. या कॅमेऱ्याला Gen 2 (200mm) ZEISS Extender चा सपोर्ट मिळतो.

X300 FE सॉफ्टवेअर : Android 16 + OriginOS 6, पाच वर्ष OS अपग्रेड्स आणि सात वर्ष सुरक्षा अपडेट्स देण्याचं वचन कंपनीनं दिलं आहे. X300 Ultra हा व्यावसायिक फोटोग्राफीसाठी तर X300 FE हा कॉम्पॅक्ट पॉवरहाऊस म्हणून बाजारात स्थान मिळवेल, अशी अशा आहे. दोन्ही फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये मजबूत स्पर्धा करतील, अशी देखील शक्यता आहे.
किंमत आणि उपलब्धता : vivo X300 FE ची 12+256 GB व्हेरिएंटसाठी79,999 किंमत ठेवण्यात आली आहे, तर 12+512 GB व्हेरिएंटची किंमत 89,999 आहे. vivo ZEISS Telephoto Extender Gen 2 ची किंमत 15,999 आहे.याव्यतिरिक्त, vivo ZEISS Telephoto Extender Accessory Kit ची किंमत 3,999 आहे. हा फोन 14 मे 2026 पासून उपलब्ध होईल.
हे वाचलंत का :

