ETV Bharat / technology

Vivo S2 भारतात लाँच; सात वर्षांनंतर एस-सिरीज देशात कमबॅक, किंमत आणि स्पेसिफिकेशन

व्हिवो इंडियानं सात वर्षानंतर भारतात Vivo S2 सिरीज लॉंच केलीय.

Vivo S2
Vivo S2 (Vivo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : August 6, 2026 at 1:17 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : Vivo S2 हा फोन आज भारतात लाँच करण्यात आला. कंपनीच्या 'S-सिरीज'मधील (S-lineup) जवळपास सात वर्षांनंतर लॉंच झालेलं हे पहिलंच मॉडेल आहे. या हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 7360-Turbo चिपसेट आणि 8GB रॅम (RAM) देण्यात आली आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट असलेली 6.83-इंचाची AMOLED स्क्रीन आहे. Vivo S2 मध्ये 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन OriginOS 6 वर चालतो आणि यात 7,050mAh ची बॅटरी आहे. यामुळं प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये व्हिवोची उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे. तरुणांसाठी डिझाइन केलेला हा फोन प्रीमियम कारागिरी, फ्लॅगशिप-स्तरीय डिझाइन, प्रगत इमेजिंग क्षमतेसह येतो.

Vivo S2
Vivo S2 वैशिष्ट्ये (Vivo)

किंतम आणि उपलब्धता: Vivo S2 डिव्हाइस तीन आकर्षक सिल्क व्हाइट, सॅफायर ब्लू आणि रिगल ब्रॉन्झ रंगांमध्ये उपलब्ध आहे.11 ऑगस्ट 2026 पासून व्हिवोच्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि भागीदार रिटेल स्टोअर्सवर याची विक्री सुरू होईल. दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये हा फोन येतो. याच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे.

Vivo S2
Vivo S2 रंग पर्याय (Vivo)

Vivo S2 ची वैशिष्ट्ये आणि तपशील : ड्युअल-सिम (नॅनो + नॅनो) असलेला Vivo S2 हा फोन Android 16-आधारित OriginOS 6 वर चालतो. यात 6.83-इंचाची 1.5K (1,260 x 2,800 पिक्सेल) AMOLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 3,000 निट्सपर्यंतची लोकल पीक ब्राइटनेस, P3 वाइड कलर गॅमट, 449ppi पिक्सेल डेन्सिटी आणि VM9 लाइट-एमिटिंग मटेरियलचा समावेश आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी या डिस्प्लेमध्ये 'इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर' देखील देण्यात आलं आहे.

Dimensity 7360-Turbo चिपसेट : या नवीन Vivo हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 7360-Turbo चिपसेट देण्यात आलं आहे, ज्यासोबत 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज मिळतं. तसंच, यात 8GB पर्यंत 'एक्सटेंडेड रॅम' (Extended RAM) ची सुविधाही उपलब्ध आहे.

ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप : कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झाल्यास, Vivo S2 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात f/1.8 अपर्चर असलेला 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा समाविष्ट आहे. फोनच्या समोरच्या बाजूला f/2.0 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पुढील आणि मागील दोन्ही कॅमेरे 4K रिझोल्यूशनपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

7,050mAh ची बॅटरी : कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल 5G, 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.4, GPS, GLONASS, Galileo, QZSS, BeiDou, OTG आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. Vivo S2 मध्ये 44W फ्लॅशचार्ज (FlashCharge) सपोर्टसह 7,050mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 'सॅफायर ब्लू' (Sapphire Blue) आणि 'रीगल ब्रॉन्झ' (Regal Bronze) रंगांमधील मॉडेल्स मापे 164.42x 75.25x 7.99 मिमी इतकी आहेत, तर 'सिल्क व्हाईट' (Silk White) व्हेरिएंटची जाडी 8.10 मिमी आहे. या हँडसेटचे वजन 'सॅफायर ब्लू' आणि 'रीगल ब्रॉन्झ' रंगांसाठी 197 ग्रॅम, तर 'सिल्क व्हाईट' रंगासाठी 199 ग्रॅम इतके आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी हा फोन IP68 आणि IP69 मानांकन (रेटिंग) असलेल्या रचनेसह येतो.

हे वाचलंत का :


  1. Redmi Note 17 : 8,000mAh बॅटरी आणि Snapdragon 4 Gen 4 प्रोसेसरसह लाँच
  2. Realme 16x 5G : 12 ऑगस्टला होणार लॉंच; Flipkart वर उपलब्ध होणार
  3. iQOO Z11 भारतात 20 ऑगस्टला लाँच होणार; डिझाईन आणि चिपसेटमध्ये फरक