ETV Bharat / technology

1 मार्च 2026 पासून स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या कोणते स्मार्टफोन होणार महाग?

मिड-रेंज फोनच्या किंमती मार्चपासून वाढणार (smartphone prices Hike) आहेत. त्यामुळं कमी किंमतीत मिळणारे स्मार्टफोन आता 1,500 ते Rs 2,500 पर्यंत महाग होण्याची शक्यता आहे.

Vivo iQOO smartphone
Vivo T4x iQOO Z10x (Vivo, iQOO)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : February 27, 2026 at 1:04 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : विवो आणि त्यांचा सब-ब्रँड iQOO यांच्या मिड-रेंज स्मार्टफोनच्या किंमतीत 1 मार्च 2026 पासून वाढ होणार असल्याची बातमी (smartphone prices Hike) आहे. T-सीरिज (विवो) आणि Z-सीरिज (iQOO) मधील अनेक मॉडेल्च्या किंमतीत वाढ होईल. ही किंमत वाढ 1,500 ते Rs 2,500 पर्यंत असू शकते. मुख्यतः DRAM आणि NAND फ्लॅश मेमरी कंपोनंट्सच्या जागतिक किंमतीत वाढ झाल्यामुळं स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता (Vivo iQOO smartphone price Hike ) आहे. टिपस्टर संजू चौधरी, आणि अभिषेक यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. बजेट आणि मिड-रेंज सेगमेंटमध्ये कमी किंमतीत विकले जाणारे स्मार्टफोन आता थोडे महाग होण्याची शक्यता आहे.

कशामुळं वाढणार किंमती?
गेल्या वर्षापासून स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रथम फ्लॅगशिप मॉडेल्स महाग झाले होते, नंतर विद्यमान फोनच्या किंमती वाढल्या. RAM आणि स्टोरेज हा स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाचा आणि खर्चिक भाग असतो. मेमरी कंपोनंट्सच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत असल्यानं त्याचा स्मार्टफोनच्या किंमतीर परिणाम होतोय. 2025 पासून मेमरी किंमतीत मोठी वाढ झाली असून, 2026 मध्येही ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळं बजेट सेगमेंटमधील फोनची किंमत वाढू शकते.

कोणत्या फोनच्या किंमती वाढणार?
Vivo T4x, T4, T4Rआणि iQOO Z10x, Z10, Z10R, Z10 lite सारख्या स्मार्टफोनच्या किंमत वाढणार आहे. काही व्हेरिएंटमध्ये 2,000 पर्यंत वाढ अपेक्षित आहे.

Vivo T4 मालिका आणि iQOO Z10 मालिकेची वाढलेली किंमत : लीकनुसार

Series ModelRAM + StorageOriginal Price (₹)Increased Price (₹)Price Hike (₹)
Vivo T4Vivo T48GB + 128GB22,99924,9992,000
Vivo T4Vivo T48GB + 256GB24,99926,9992,000
Vivo T4Vivo T412GB + 256GB26,99928,9992,000
Vivo T4RVivo T4R8GB + 128GB20,99922,9992,000
Vivo T4RVivo T4R8GB + 256GB22,99924,9992,000
Vivo T4RVivo T4R12GB + 256GB24,99926,9992,000
Vivo T4xVivo T4x6GB + 128GB15,49916,9991,500
Vivo T4xVivo T4x8GB + 128GB16,49918,9992,500
Vivo T4xVivo T4x8GB + 256GB18,49920,9992,500
iQOO Z10iQOO Z108GB + 128GB22,99924,9992,000
iQOO Z10iQOO Z108GB + 256GB24,99926,9992,000
iQOO Z10iQOO Z1012GB + 256GB26,99928,9992,000
iQOO Z10RiQOO Z10R8GB + 128GB20,99922,9992,000
iQOO Z10RiQOO Z10R8GB + 256GB22,99924,9992,000
iQOO Z10RiQOO Z10R12GB + 256GB24,99926,9992,000
iQOO Z10xiQOO Z10x6GB + 128GB15,49916,9991,500
iQOO Z10xiQOO Z10x8GB + 128GB16,49918,9992,500
iQOO Z10xiQOO Z10x8GB + 256GB18,49920,9992,500

हे वाचलंत का :

  1. 'फोन पे, गुगल पे'चं धाब दणाणलं : अ‍ॅपल पे लवकरच भारतात होणार लाँच
  2. iQOO Z11x 5G लवकरच होणार भारतात लॉंच; MediaTek Dimensity 7400 Turbo सोबत सर्वात वेगवान स्मार्टफोन
  3. मार्च महिन्यात पडणार स्मार्टफोनचा पाऊस, पहिल्याच हप्यात लॉंच होणार सात नवे स्मार्टफोन, वाचा संपूण यादी....