मार्च महिन्यात पडणार स्मार्टफोनचा पाऊस, पहिल्याच हप्यात लॉंच होणार सात नवे स्मार्टफोन, वाचा संपूण यादी....
मार्च 2026 मध्ये स्मार्टफोनचा पाऊसच पडणार आहे. Nothing Phone 4a, iPhone 17e आणि Edge 70 Fusion सारखे स्मार्टफोन लवकरच लॉंच होणार आहेत. वाचा संपूर्ण यादी...

Published : February 27, 2026 at 9:36 AM IST
मुंबई : फेब्रुवारी 2026 मध्ये Galaxy S26 सीरिज, Pixel 10a आणि Xiaomi 17 सीरिज लॉंच झालीय. आता मार्च महिन्यात स्मार्टफोन लॉंचचा पाऊसच पडणार आहे.Apple, Motorola, Honor, Nothing, POCO आणि AI+ सारख्या ब्रँड्सकडून मिड-रेंज ते हाय-एंड फोन्स लॉंच करण्यात येणार आहे. हे नवीन फोन्स AI फीचर्स, मोठ्या बॅटरी, उत्तम कॅमेरा आणि इनोव्हेटिव्ह डिझाइनसह येत आहेत.भारतीय बाजारपेठेतही अनेक लॉंच होणार असून, बजेट ते प्रीमियम सेगमेंटपर्यंत पर्याय उपलब्ध होतील.
Honor Magic V6 आणि Robot Phone
1 मार्च 2026 रोजी Honor कंपनी MWC इव्हेंटमध्ये दोन मोठे स्मार्टफोन लॉंच करणार आहे. Honor Magic V6 हा कंपनीचा नवीन फोल्डेबल फोन आहे, ज्यात सुधारित ड्युरॅबिलिटी, जास्त बॅटरी आणि स्लिम डिझाइनवर फोकस आहे. यात 200MP प्रायमरी कॅमेरा, 7,150mAh बॅटरी 120W फास्ट चार्जिंगसह, पूर्ण वॉटरप्रूफिंग आणि Beidou सॅटेलाइट कम्युनिकेशन सपोर्ट असेल. Honor चा सेल्फ-डेव्हलप्ड C1+ RF एन्हान्समेंट चिप आणि E2 एनर्जी एफिशियन्सी चिप यामुळं परफॉर्मन्स उत्तम राहील.
Imagine a phone that's not just smart, but a captivating work of art.
— HONOR (@Honorglobal) February 25, 2026
Meet the HONOR Magic V6 in Red – where groundbreaking technology dances with exquisite design.
Does this vibrant fusion of beauty and power resonate with your unique style?😉 pic.twitter.com/RdyQCJ1aMQ
Honor Robot Phone
हा इंडस्ट्रीचा पहिला "रोबोट फोन" म्हणून ओळखला जाणार आहे. CES 2026 मध्ये याचा टीझर दाखवला होता. यात हिडन रोबोटिक-आर्म गिम्बल आहे, जो एका टॅपनं डिप्लॉय होतो. हे ऑटोमॅटिक कंपोजिशन, सब्जेक्ट ट्रॅकिंग आणि स्टेबिलायझेशनसाठी फोनला फिजिकली हलवतं. AI सिस्टम रिअल-टाइममध्ये पाहून रिस्पॉन्स देतं, कंटेंट सुचवतं आणि इकोसिस्टममधील डिव्हाइसेससोबत कोऑर्डिनेट करतं. हे डिजिटल असिस्टंट खूप पर्सनल आणि कॉन्टेक्स्ट-अवेअर वाटेल. मात्र हे दोन्ही फोन भारतात लॉंच होणार नाहीय.
You’re invited. ✨
— HONOR (@Honorglobal) February 23, 2026
Join us for the HONOR MWC 2026 Global Launch Event on March 1st. Expect the global premiere of the HONOR Robot Phone and HONOR Magic V6, alongside other new devices and industry-leading updates. Beyond hardware, we stand as Believers in AI's future, committed… pic.twitter.com/lyP0JVkyxP
AI+ Pulse 2
भारतात मार्च महिन्यात लॉंच होणारा पहिला फोन AI+ Pulse 2 नं असणार आहे. हा फोन 2 मार्च 2026 रोजी भारतात लॉंच होईल. कंपनीनं यात 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा आणि 8MPफ्रंट कॅमेरा दिला आहे. सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे स्लिम डिझाइनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी ऑल-डे वापरासाठी पुरेशी आहे. हा फोन Android 16 आधारित NxtQuantum OS वर चालेल. या फोनची किंमत 10,000 पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
Not merely an upgrade, but a true evolution.#Pulse2 launching on March 2, 2026 at 12PM. pic.twitter.com/cdyUjjmweW
— Madhav Sheth (@MadhavSheth1) February 26, 2026
Apple iPhone 17e (Unconfirmed)
मार्चमध्ये अपडेटेड बजेट iPhone 4 मार्च 2026 रोजीApple च्या इव्हेंटमध्ये iPhone 17e लॉंच होण्याची शक्यता आहे. हा A19 चिपसह येईल. अपग्रेडेड डिस्प्ले इंजिन, ISP आणि Neural Engineमुळं ऑन-डिव्हाइस AI परफॉर्मन्स सुधारेल. MagSafe चार्जिंग 15W पर्यंत वाढेल आणि अपग्रेडेड C1X मॉडेम असेल. डिस्प्ले, कॅमेरा आणि डिझाइन iPhone 16e सारखेच राहील. हा बजेट iPhone चाहत्यांसाठी उत्तम अपग्रेड असेल.
🍎 APPLE LAUNCH WEEK STARTS MONDAY
— Abhishek Yadav (@yabhishekhd) February 26, 2026
• MacBook lineup with M5, M5 Pro & M5 Max
• New Budget MacBook powered by A18 Pro 👀
• iPhone 17e with A19 chip
• iPad Air (M4) refresh
• iPad 12th Gen incomingpic.twitter.com/wvPtszTzpf
Nothing Phone (4a)
5 मार्च 2026 रोजी Nothing Phone (4a) लॉंच होईल. यात रिडिझाइन केलेली Glyph Bar लाइटिंग सिस्टम आहे, ज्यात रेड LED रेकॉर्डिंग सिग्नलसाठी आहे. हा Android 16 च्या लाइव्ह अपडेट्ससोबत काम करतो. फोनमध्ये 6.78-इंच 120Hz AMOLED डिस्प्ले, Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसर, 50MP प्रायमरी रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा असेल. 8GB/12GB RAM आणि 128GB स्टोरेज पर्याय उपलब्ध होतील. डिझाइन आणि Glyph फीचर्समुळं तो यंगस्टर्समध्ये लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.
It’s pink now.
— Nothing (@nothing) February 25, 2026
Phone (4a). 5 March, 10:30 GMT. pic.twitter.com/BXZWUnoUhg
Motorola Edge 70 Fusion
6 मार्च 2026 रोजी Motorola Edge 70 Fusion लॉंच होईल. यात कर्व्ड 1.5K डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 5,200 निट्स पीक ब्राइटनेस आहे. हा फोन Snapdragon 7s Gen 4 चिपसेट, 7,000mAh बॅटरी 68W फास्ट चार्जिंगसह येईल. ट्रिपल रियर कॅमेऱ्यात 50MP Sony LYT-710 प्रायमरी (OIS), 13MP अल्ट्रावाइड आणि मॅक्रो, 32MP सेल्फी कॅमेरा असेल.
The motorola edge 70 fusion introduces the world’s first 50MP Sony LYTIA™ 710 camera powered by motoAI.
— Motorola India (@motorolaindia) February 26, 2026
Come experience the fusion life.
Launching 6th March on Flipkart, https://t.co/YA8qpSXba4 and leading retail stores#Edge70Fusion #CaptureBeyondTheOrdinary pic.twitter.com/g12lXLQ1EM
POCO X8 Pro Series (Unconfirmed)
मार्चच्या पहिल्या आठवड्यात POCO X8 Pro आणि X8 Pro Max भारतात लॉंच होण्याची अपेक्षा आहे. POCO X8 Pro मध्ये 6.59 इंच 1.5K OLED डिस्प्ले 120Hz आणि 2000 निट्स ब्राइटनेस, Dimensity 8350 Ultra प्रोसेसर, LPDDR5x RAM, UFS 4.1 स्टोरेज असेल. कॅमेऱ्याबाबत बोल्याचं झाल्यास 50MP Sony IMX882 प्रायमरी (OIS), 8MP अल्ट्रावाइड, 20MP फ्रंट असेल. या फोनला पॉवर देण्यासाठी 6,500mAh बॅटरी 100W चार्जिंग सपोर्ट असेल. तसंच धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी IP68/IP69/IP69K रेटिंग मिळेल.
POCO X8 Pro Series key details.
— Abhishek Yadav (@yabhishekhd) February 19, 2026
• POCO X8 Pro Max — Dimensity 9500s, dual flash
• POCO X8 Pro — Dimensity 8500 Ultra, single flash
POCO X8 Pro Max (expected)
📱 6.83" 1.5k tcl m10 oled, 120hz, 2000 nits hbm, 3840hz pwm
⚙️ dimensity 9500s + immortalis-g925 mc12
💾 lpddr5x… pic.twitter.com/6ASMWHOSn9
POCO X8 Pro Max
POCO X8 Pro Max मध्ये 6.86 -इंच OLED, Dimensity 9500s प्रोसेसर, 50MP Light Hunter 600 प्रायमरी, 8MP अल्ट्रावाइड, 20MP सेल्फी. 8,500mAh बॅटरी 100W चार्जिंग + 27W रिव्हर्स, ड्युअल स्पीकर्स, LHDC 5.0, 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट आणि IP68/IP69/IP69K रेटिंग असेल.
मार्च 2026 मध्ये विविध सेगमेंटमध्ये उत्तम पर्याय उपलब्ध होतील. AI, फोल्डेबल, रोबोटिक इनोव्हेशन आणि पॉवरफुल स्पेक्स यामुळं हा महिना स्मार्टफोन मार्केटसाठी खास असेल. नवीनतम अपडेट्ससाठी ईटीव्ही भारतला नक्की फॉलो करा...
हे वाचलंत का :

