ETV Bharat / technology

'या' आठवड्यात नविन स्मार्टफोनचा धमाका, रेडमी, रियलमी, पोको, मोटोरोला आणि ओप्पोची धमाल

या आठवड्यात भारतात रेडमी, रियलमी, पोको, मोटोरोला आणि ओप्पोचे नवीन स्मार्टफोन्स लाँच होताय. शक्तिशाली प्रोसेसर, उत्तम कॅमेरे आणि आकर्षक डिझाइनसह बाजारात ते धमाल करतील.

Redmi Note 15, Realme 16 Pro series, Poco M8 5G, and Motorola Signature
नविन स्मार्टफोन लॉंच (Redmi, Realme, Oppo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : January 2, 2026 at 10:34 AM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : या आठवड्यात भारतीय बाजारात स्मार्टफोन कंपन्या धमाका करण्यास सज्ज झाल्या आहेत. जानेवारी 2026 मध्ये रेडमी, रियलमी, पोको, मोटोरोला आणि ओप्पो सारख्या प्रमुख ब्रँड्सकडून अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. मिड-रेंज ते प्रीमियम सेगमेंटपर्यंत विविध पर्याय उपलब्ध होणार असून, यात शक्तिशाली प्रोसेसर, उत्तम कॅमेरे, मोठ्या बॅटरी आणि आकर्षक डिझाइनची वैशिष्ट्ये असतील. काही फोन्सची लाँच तारीख निश्चित झाली आहे, तर काहींचे अधिकृत टीझर्स जाहीर झाले आहे. या बातमी आपण या आठवड्यात लॉंच होणाऱ्या प्रमुख स्मार्टफोन्सची माहिती आणि त्यांच्या अपेक्षित वैशिष्ट्यांचा तपशील जाणून घेणार आहोत. ज्यामुळं तुम्हाला फोन खेरेदी करण्यापूर्वी मदत होईल.

रेडमी नोट 15 सीरिज
शाओमीच्या रेडमी ब्रँडनं रेडमी नोट 15 सीरिज भारतात 5 जानेवारीला लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही सीरिज मिड-रेंज सेगमेंटमध्ये लोकप्रिय असते आणि यावेळी स्नॅपड्रॅगन 6 जन 3 प्रोसेसरसह येत आहे. कंपनीच्या मते, हा प्रोसेसर जीपीयूमध्ये 10 टक्के आणि सीपीयूमध्ये 30 टक्के सुधारणा देतो, तसंच 45 महिने लॅग-फ्री परफॉर्मन्स देतो. फोनमध्ये 5,520 एमएएच बॅटरी आणि 45 वॅट फास्ट चार्जिंग आहे, ज्यामुळं एका चार्जवर 1.6 दिवस वापरता येईल.

A promotional image for the Redmi Note 15 5G, featuring the text
रेडमी नोट 15 सीरिज (Redmi)

Redmi Note 15 सीरिज (अपेक्षित वैशिष्ट्ये)

वैशिष्ट्यतपशील
डिस्प्ले6.77 इंच AMOLED, Full HD+, 120Hz रिफ्रेश रेट, 3200 निट्स पीक ब्राइटनेस
प्रोसेसरQualcomm Snapdragon 6 Gen 3
रॅम / स्टोरेज12 जीबी पर्यंत LPDDR4x रॅम, 256 जीबी पर्यंत
रियर कॅमेरा108 MP मुख्य + 8MP अल्ट्रा-वाइड
फ्रंट कॅमेरा20MP
बॅटरी5,520mAh
चार्जिंग४५W वायर्ड
ऑपरेटिंग सिस्टमAndroid 16 आधारित HyperOS
संरक्षणIP68
लाँच तारीख6 जानेवारी 2026

रियलमी 16 प्रो सीरिज
रियलमी 16 प्रो आणि 16 प्रो प्लस हे दोन मॉडेल्स 6 जानेवारीला भारतात लाँच होणार आहेत. या सीरिजमध्ये 200 मेगापिक्सेल लुमाकलर कॅमेरा सिस्टम आहे, जी फोटोग्राफीवर विशेष भर देते. डिझाइनमध्ये जपानी डिझायनर नाओतो फुकासावाशी सहकार्य असून, "अर्बन वाइल्ड डिझाइन" थीम आहे. प्रो मॉडेल मीडियाटेक डायमेंसिटी 7300-मॅक्स तर प्रो प्लस स्नॅपड्रॅगन 7 जन 4 प्रोसेसरसह येईल. दोन्ही फोन्समध्ये 7,000 एमएएच बॅटरी आणि 80 वॅट चार्जिंग अपेक्षित आहे.

undefined
रियलमी 16 प्रो सीरिज (Realme )

Realme 16 Pro सीरिज (अपेक्षित वैशिष्ट्ये)

वैशिष्ट्यतपशील
डिस्प्लेAMOLED, 120Hz+ रिफ्रेश रेट
प्रोसेसरMediaTek Dimensity 7300-Max / Snapdragon 7 Gen 4
रॅम / स्टोरेजउच्च रॅम आणि स्टोरेज पर्याय
रियर कॅमेरा200MP LumaColor मुख्य सेन्सर
बॅटरी7,000mAh
चार्जिंग80W फास्ट चार्जिंग
ऑपरेटिंग सिस्टमAndroid 16 आधारित Realme UI 7.0
डिझाइनUrban Wild डिझाइन (Naoto Fukasawa सहकार्य)
लाँच तारीख6 जानेवारी 2026

Poco M8 5G
पोकोM8 5G 8 जानेवारीला लाँच होईल. हा फोन फक्त 7.35 मिमी जाड आणि 178 ग्रॅम वजनाचा असून, सेगमेंटमधील सर्वात स्लिम आणि लाइट फोन आहे. टीझरमध्ये कर्व्ड डिस्प्ले आणि स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल दिसते. हा स्नॅपड्रॅगन 6 जन 3 प्रोसेसरसह रेडमी नोट 15 चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

Image
Poco M8 5G (Flipkart)

POCO M8 5G - अपेक्षित वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यतपशील
डिस्प्ले6.77 इंच AMOLED, 120Hz, 3200 निट्स पीक ब्राइटनेस
प्रोसेसरQualcomm Snapdragon 6 Gen 3
रॅम / स्टोरेज8 जीबी पर्यंत रॅम, 256 जीबी स्टोरेज
रियर कॅमेरा50MP मुख्य
फ्रंट कॅमेरा20MP
बॅटरी5,520 mAh
चार्जिंग45W वायर्ड
ऑपरेटिंग सिस्टमHyperOS 2 (Android 15 आधारित)
जाडी / वजन7.35 mm, 178 ग्रॅम
लाँच तारीख8 जानेवारी 2026

मोटोरोला सिग्नेचर
मोटोरोलाची नवीन प्रीमियम सीरिज 'सिग्नेचर' जानेवारीत येत आहे. फोनमध्ये फॅब्रिक फिनिश बॅक, फ्लॅट डिस्प्ले आणि कस्टमायझेबल बटन आहे. हा स्नॅपड्रॅगन 8 जन 5 प्रोसेसरसह फ्लॅगशिप लेव्हलचा फोन असेल.

Motorola Signature teaser
मोटोरोला सिग्नेचर (Motorola)

Motorola Signature (अपेक्षित वैशिष्ट्ये)

वैशिष्ट्यतपशील
डिस्प्ले6.7 इंच OLED, 1.5K रिझोल्यूशन
प्रोसेसरQualcomm Snapdragon 8 Gen 5
रॅम16 जीबी पर्यंत
रियर कॅमेराट्रिपल कॅमेरा सेटअप (पेरिस्कोप टेलिफोटो अपेक्षित)
ऑपरेटिंग सिस्टमAndroid 16 विथ Motorola Hello UI
डिझाइनफॅब्रिक फिनिश बॅक पॅनेल, फ्लॅट डिस्प्ले, कस्टमायझेबल बटन
रंगCarbon, Martini Olive
कनेक्टिव्हिटी5G, Wi-Fi, Bluetooth, USB Type-C
लाँच तारीख7 जानेवारी 2026

ओप्पो रेनो 15 सीरिज
ओप्पो रेनो 15, रेनो 15 प्रो आणि रेनो 15 प्रो मिनी हे तीन मॉडेल्स येत आहेत. नवीन होलोफ्यूजन टेक्नोलॉजीमुळं ग्लास बॅकवर थ्री-डी इफेक्ट येईल. सीरिजमध्ये मोठ्या बॅटरी आणि उत्तम कॅमेरे आहेत.

Reno15 Series 5G
OPPO Reno 15 Series (OPPO)

OPPO Reno 15 सीरिज (अपेक्षित वैशिष्ट्ये)

वैशिष्ट्यतपशील
डिस्प्ले6.32-6.78 इंच AMOLED, 120Hz, 3600 निट्स पर्यंत ब्राइटनेस
प्रोसेसरMediaTek Dimensity 8450 (काही मॉडेल्समध्ये Snapdragon 7 Gen 4)
रियर कॅमेरा200MP मुख्य + 50MP अल्ट्रा-वाइड + 50MP टेलिफोटो (OIS)
फ्रंट कॅमेरा50MP
बॅटरी6,200 किंवा 6,500mAh
चार्जिंग80W वायर्ड
ऑपरेटिंग सिस्टमColorOS 16 (Android 16 आधारित)
डिझाइन / संरक्षणHoloFusion 3D ग्लास बॅक, IP66/68/69, Gorilla Glass 7i
जाडी / वजन7.65-7.99 mm, 187-205 ग्रॅम
लाँच तारीखजानेवारी 2026 (लवकरच अपेक्षित)

हा आठवडा भारतीय ग्राहकांसाठी खास ठरणार आहे. मिड-रेंजमध्ये रेडमी, पोको आणि रियलमी तर प्रीमियममध्ये मोटोरोला आणि ओप्पो स्पर्धा करणार आहेत. कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्समध्ये मोठी सुधारणा अपेक्षित आहे. लाँचनंतर किंमती आणि उपलब्धतेची अधिक माहिती मिळेल.

हे वाचलंत का :

  1. बीएसएनएलनं देशभरात सुरू केली मोफत व्हॉईस ओव्हर वाय-फाय सुविधा
  2. Moto X70 Air Pro : स्लिम फ्लॅगशिपचा प्रो व्हर्जन लवकरच होणार लाँच
  3. मोटोरोला सिग्नेचरचा पहिला टीझर अधिकृतपणे जारी, लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसं पाहावं?