ETV Bharat / technology

मॅसॅच्युसेट्सच्या आकाशात उल्केचा थरारक स्फोट: 300 टन TNT इतकी ऊर्जा

मॅसाच्युसेट्समध्ये 3 मीटर व्यासाच्या उल्कापिंडेचा 40 मैल उंचीवर स्फोट (Meteor Explosion) झाला. यात 300 टन ऊर्जा निर्माण झाली होती. या भयानक स्फोटानं बोस्टन हादरलंय.

satellite image of an explosion that occurred at a considerable altitude in Earth's atmosphere.
पृथ्वीच्या वातावरणात उंचावर झालेल्या एका स्फोटाची उपग्रह प्रतिमा (CSU/CIRA आणि NOAA)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : June 1, 2026 at 3:31 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई: अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यात आकाशात एका मोठ्या उल्केचा 40 मैल उंचीवर स्फोट (Meteor Explosion) झालाय. या स्फोटातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय. या स्फोटामुळं 300टन TNT ऊर्जा निर्माण झाल्याचं सांगितलं जातंय. स्फोटानंतर आकाशात प्रकाशाचा एक लख्ख झोत (flash) दिसून आला, ज्यासोबतच एक मोठा गडगडाटही ऐकू आला. बॉस्टनसह संपूर्ण 'न्यू इंग्लंड' भागातील रहिवाशांनी या स्फोटामुळं आपली घरे थरथरल्याचं अनुभवलं. NASA आणि इतर संस्थांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

ही घटना कशी घडली? : सुमारे 3 मीटर व्यास असलेली ही उल्का, ताशी 75,000 मैल (1,20,000 किलोमीटर प्रति तास) या प्रचंड वेगानं पृथ्वीच्या वातावरणात शिरली. वातावरणातील घर्षणामुळं ती तापली आणि प्रज्वलित होऊ लागली. अखेरीस, 40 मैल (सुमारे 64 किलोमीटर) उंचीवर तिचा स्फोट झाला. या स्फोटातून प्रकाशाचा एक तेजस्वी झोत निर्माण झाला आणि एक 'सोनिक बूम' (ध्वनीचा प्रचंड स्फोट) ऐकू आला. ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता (EDT नुसार दुपारी 2:06 वाजता) घडली. NASA च्या उप-प्रवक्त्या जेनिफर ड्युरेन यांनी सांगितलं, "ही उल्का कोणत्याही सक्रिय उल्कावर्षावाशी (meteor shower) संबंधित नव्हती. ही एक नैसर्गिक खगोलीय वस्तू होती. ती कोणताही उपग्रह किंवा अवकाशातील कचऱ्याचा तुकडा नव्हती. या स्फोटामुळं मोठा आवाज झाला." 'अमेरिकन मेटिअर सोसायटी'नेही या घटनेला दुजोरा दिला आहे.

जनतेच्या प्रतिक्रिया आणि पुरावे : बॉस्टन आणि आसपासच्या भागातील रहिवाशांनी मोठ्या संख्येनं सोशल मीडियावर जाऊन या घटनेबद्दल माहिती पोस्ट केली. अनेकांनी या घटनेचं वर्णन "आकाशातील प्रकाशाचा स्फोट" असं केलं, तर काहींना तो आवाज ऐकून "घर थरथरल्याचा" अनुभव आला. डेलावेअरपासून ते थेट मॉन्ट्रियलपर्यंतच्या अनेक ठिकाणांहून या घटनेबाबतचे अहवाल प्राप्त झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी तर दोनदा स्फोटाचा आवाज (double boom) ऐकल्याचंही सांगितलं. अंतराळ उड्डाण क्षेत्रातील हवामानतज्ज्ञ निक स्टुअर्ट यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिलं, "बॉस्टनजवळ स्फोट झाल्याचा अहवाल समोर आला आहे. GOES-19 उपग्रहानं प्रकाशाचा एक मोठा झोत (flash) नोंदवला आहे, जो कोणत्याही वादळी हालचालींशी संबंधित नव्हता." नासा स्पेस अलर्ट्सनं असंही कळवलं की, न्यू इंग्लंड आणि एनओएए (NOAA) च्या उपग्रहांनी हा तेजस्वी अग्निगोळा शोधला. हा उल्कापिंड ईशान्य मॅसॅच्युसेट्स आणि आग्नेय न्यू हॅम्पशायरवर विघटित झाला.

सोनिक बूम : अमेरिकन मेटिअर सोसायटीचे रॉबर्ट लन्सफोर्ड म्हणाले, “हा एका स्फोट सामान्य अग्निगोळ्यापेक्षा मोठा होता. त्याची रुंदी अंदाजे एक यार्ड (1 मीटर) होती. संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतरच तो जमिनीवर पोहोचला की नाही, हे आपल्याला कळेल. बहुतेक उल्का पूर्णपणे जळून जातात.” युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनं या घटनेचं वर्णन “बोलिड (उल्का) द्वारे निर्माण झालेला सोनिक बूम” असं केलं आहे. या प्रकारच्या उल्कांना बोलिड किंवा अग्निगोळे म्हटलं जाते. जेव्हा त्या वातावरणात प्रवेश करतात, तेव्हा प्रचंड वेग आणि घर्षणामुळं त्या तीव्रतेनं चमकतात आणि कधीकधी त्यांचा स्फोटही होतो. सुदैवानं, हे उल्कापिंड जमिनीवर आदळलं नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये, अशा वस्तू एकतर समुद्रात पडतात, निर्जन भागात किंवा पूर्णपणे जळून जातात. या घटनेत कोणतंही नुकसान झालं नाही. खगोलशास्त्र आणि वातावरणीय घटनांच्या अभ्यासासाठी या घटनेला महत्त्व आहे. नासा, नोआ (NOAA) आणि इतर संस्था उपग्रह, जमिनीवरील सेन्सर्सचा वापर करून अशा घटनांचा सतत मागोवा घेतात.

हे वाचलंत का :

  1. नासा Artemis III च्या क्रूची लवकरच होणार घोषणा; चंद्राच्या पृष्ठभागावर होणार लॅंडिंग
  2. नासानं जाहीर केला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कायमस्वरूपी ‘मून बेस’चा मास्टर प्लॅन
  3. वॉयेजर 1 वरील आणखी एक वैज्ञानिक उपकरण बंद; 2030 पर्यंत संदेश पाठवणे शक्य