ETV Bharat / technology

अँथ्रोपिक एआय तंत्रज्ञानाचा वापर 'तत्काळ' थांबवा; डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन सरकारला आदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Anthropic च्या Claude AI तंत्रज्ञानाचा सरकारी वापर तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : February 28, 2026 at 8:41 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी सरकारला Anthropic कंपनीच्या AI तंत्रज्ञानाचा (Claude मॉडेल्स) वापर तत्काळ थांबवण्याचे आदेश (Stop using anthropic AI technology ) दिले. ही घटना पेंटागॉन (अमेरिकन संरक्षण विभाग) आणि Anthropic यांच्यातील वादानंतर घडली. Anthropic नं पेंटागॉनच्या निर्बंधरहित सैन्य वापराच्या मागणीला नकार दिला होता. कंपनीनं Claude AI चा वापर अमेरिकन नागरिकांच्या सामूहिक निरीक्षणासाठी किंवा पूर्ण स्वयंचलित शस्त्रास्त्रांमध्ये होऊ नये, अशी अट घातली होती. ट्रम्प यांनी Truth Social वर पोस्ट करून हा निर्णय जाहीर केलाय. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, फेज-आउट काळात सहकार्य न केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

ट्रम्प यांची आदेश
ट्रम्प यांनी लिहिलं, "मी अमेरिकेच्या प्रत्येक फेडरल एजन्सीला Anthropic च्या तंत्रज्ञानाचा वापर तत्काळ थांबवण्याचे निर्देश देत आहे. आम्हाला त्यांची गरज नाहीय, आम्ही ते वापरणार नाही आणि पुन्हा व्यवसाय करणार नाही!" त्यांनी संरक्षण विभागासारख्या एजन्सींसाठी सहा महिन्यांचा फेज-आउट कालावधी जाहीर केलाय. "Anthropic नं आपलं वर्तन सुधारावं, अन्यथा राष्ट्रपतींच्या पूर्ण अधिकारांचा वापर करून त्यांना जबरदस्तीनं सहमत करेन, अन्यथा फौजदारी कारवाई करेन."

पेंटागॉनची भूमिका आणि कारवाई
पेंटागॉननं Anthropic ला शुक्रवारी सायंकाळी 5:01 पर्यंत (GMT 22:01 ) पर्यंत निर्बंधरहित वापरास सहमती देण्याची मुदत दिली होती. तसं न झाल्यास Defense Production Act अंतर्गत जबरदस्ती आणि कंपनीला 'सप्लाय चेन रिस्क' म्हणून घोषित करण्याची धमकी मिळालीय. संरक्षणमंत्री पिट हेगसेथ यांनी कंपनीला "राष्ट्रीय सुरक्षेसाठी सप्लाय चेन रिस्क" घोषित केलंय. त्यामुळं अमेरिकन लष्कराशी व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही ठेकेदार किंवा पुरवठादाराला Anthropic बरोबर व्यवसाय करता येणार नाही. हेगसेथ यांनी X वर लिहिलं की, Anthropic नं "अहंकार आणि विश्वासघात" दाखवला. त्यांना सरकारशी व्यवसाय कसा करावा?, हे शिकवलं नाही.

Anthropic ला पाठिंबा
Anthropic नं पेंटागॉनच्या मागण्या नाकारल्या आहेत. कंपनीचे CEO Dario Amodei यांनी सांगितलं की, कंपनी लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी अशा वापरास परवानगी देऊ शकत नाही. Google, DeepMind आणि OpenAI च्या शेकडो कर्मचाऱ्यांनी खुलं पत्र लिहत Anthropic ला पाठिंबा दर्शवला आहे. "आम्ही विभागलं जाणार नाही, आम्ही सामूहिक निरीक्षण किंवा मानवी देखरेखीशिवाय स्वयंचलित हत्येसाठी AI वापरणार नाही," असं पत्रात म्हटलं आहे. OpenAI चे CEO Sam Altman यांनीही समान रेड लाइन्ससह करार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं.

टीका आणि परिणाम
Center for Democracy and Technology (CDT) नं ट्रम्प यांच्या कारवाईला "धोकादायक" म्हटलंय. CDT च्या प्रमुख Alexandra Givens यांनी सांगितलं की, कंपनीनं AI च्या अत्यंत कठोर वापरावर मर्यादा घातली. यामुळं खाजगी कंपन्यांना सरकारशी मुक्त चर्चा करण्यात अडथळा येईल. हा वाद AI च्या सैन्य वापरावर मोठा प्रभाव टाकू शकतो आणि अमेरिकन AI उद्योगाच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित करू शकतो.

हे वाचलंत का :

  1. ओपनएआयमध्ये 110 अब्ज डॉलरची नवी गुंतवणूक; मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय यांच्यातील भागीदारी मजबूत
  2. ओपनएआय आणि ॲमेझॉन यांच्यातील मोठी धोरणात्मक भागीदारी
  3. मुलानं आत्महत्याशी संबंधित शब्द सर्च केल्यास पालकांना मेटा पाठवणार अलर्ट