Galaxy Unpacked 2026 : Samsung Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra ची A To Z माहिती
आज रात्री 11:30 वाजता Galaxy Unpacked 2026 इव्हेंटमध्ये S26, S26+ आणि S26 Ultra लॉंच होणार आहे. गॅलक्सी AI, टायटॅनियम डिझाइन आणि शक्तिशाली कॅमेऱ्यासह प्री-रिझर्वेशन सुरू!

Published : February 25, 2026 at 10:00 AM IST
मुंबई : सॅमसंग चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज 25 फेब्रुवारी 2026 रोजी सॅमसंगचा पहिला गॅलक्सी अनपॅक्ड इव्हेंट 2026 होणार आहे. या कार्यक्रमात कंपनी गॅलक्सी S26 सीरीजचे औपचारिक अनावरण करणार आहे. भारतात हा इव्हेंट रात्री 11:30 वाजता (IST) सुरू होईल. सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियामध्ये होणारा हा कार्यक्रम जगभरातील लाखो सॅमसंग चाहत्यांना लाईव्ह पाहता येणार आहे.
💙 like this post and be the first to see what’s coming.
— Samsung India (@SamsungIndia) February 11, 2026
Join us at Samsung Galaxy Unpacked on February 25, 2026 to discover how easy and effortless your day can be with Galaxy AI. Keep watching this space for more Galaxy Unpacked updates!
तीन मॉडेल्सचा समावेश
गॅलक्सी S26, S26+ आणि S26 अल्ट्रा या तीन मॉडेल्सचा समावेश असलेली ही फ्लॅगशिप सीरीज गॅलक्सी AI वैशिष्ट्यांसह येणार असल्याचं सॅमसंगनं सांगितलं आहे. “Galaxy AI feel seamlessly integrated from the moment it's in hand” असं कंपनीचं घोषवाक्य आहे. याचा अर्थ, फोन हातात घेताच AI तुमच्या दैनंदिन जीवनाला सोपं आणि सहज बनवेल. प्री-रिझर्वेशन आधीच सुरू झालं असून, फक्त 999 रुपयांत VIP पास मिळवता येतो. खरेदी करताना अनेक फायदे, व्हाउचर आणि प्रायोरिटी अॅक्सेस मिळणार आहेत. या फोनची विक्री 11 मार्च रोजी होणार आहे. या बातमीत आपण सॅमसंग गॅलक्सी S26 सीरीजची अपेक्षित किंमत जाणून घेणार आहोत..
गॅलक्सी अनपॅक्ड 2026 इव्हेंट
सॅमसंगचा गॅलक्सी अनपॅक्ड 2026 हा कार्यक्रम आज रात्री 11:30 वाजता IST वेळेनुसार सुरू होईल. अमेरिकेच्या PT वेळेनुसार सकाळी 10 वाजता आणि ET वेळेनुसार दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील भव्य स्टेजवर सॅमसंग आपल्या नवीन तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करणार आहे.
How many of you have pre-reserved the Galaxy S26 Ultra?
— Rajesh Rajput (Technobuzz) (@iRaj_r) February 25, 2026
And by the way, which color are you going to pick this time? pic.twitter.com/HxbDt7dYPj
वेळ, स्थान आणि लाईव्ह स्ट्रीमिंग
भारतीय ग्राहकांसाठी हा इव्हेंट खास असेल. कारण या कार्यक्रमात भारतासाठी विशेष ऑफर्स जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी तुम्ही Samsung.com, Samsung Newsroom आणि सॅमसंगच्या अधिकृत YouTube चॅनेलवर हा इव्हेंट पाहू शकता. तुम्ही घरबसल्या मोबाईल, टॅबलेट किंवा स्मार्ट टीव्हीवर हा कार्यक्रम पाहू शकता. इव्हेंटमध्ये फक्त फोनच नाही तर गॅलक्सी AI च्या नवीन वैशिष्ट्यांचं खास डेमो दाखवले जाणार आहे. यामुळं दैनंदिन कामं जसे की फोटो एडिटिंग, भाषांतर, स्मार्ट सजेशन्स इत्यादी सहज होतील. सॅमसंगनं यापूर्वी S25 सीरीजमध्ये AI आणलं होतं, आता S26 मध्ये ते आणखी प्रगत होण्याची अपेक्षा आहे. इव्हेंटनंतर लगेचच प्री-ऑर्डर सुरू होतील. त्यामुळं इव्हेंट पाहणे आणि लगेच प्री-ऑर्डर करणं हा उत्तम पर्याय आहे. भारतासाठी हे लाँच विशेष असेल. कारण सॅमसंगचा भारतीय बाजारात मोठा वाटा आहे.
Recently, the number of Galaxy S26 Ultra leak videos has been increasing rapidly and has already reached a disaster-level situation. Although TM Roh has begun to take it seriously and has started an investigation, it may already be too late. I can’t shake the feeling that this… pic.twitter.com/KgQb1cZUCf
— Ice Universe (@UniverseIce) February 25, 2026
गॅलक्सी S26, S26+ आणि S26 अल्ट्रा (अपेक्षित)
सॅमसंग यावर्षी तीन मॉडेल्स लाँच करणार आहे. यात Galaxy S26, Galaxy S26+ आणि Galaxy S26 Ultra चा समावेश असेल. लीक झालेल्या रेंडर्सनुसार S26 अल्ट्रा मध्ये टायटॅनियम बिल्ड, रिफाईंड कॅमेरा आयलंड आणि मोठे हाय-रिफ्रेश-रेट AMOLED डिस्प्ले असणार आहे. तीनही फोनमध्ये व्हायब्रंट कलर ऑप्शन्स उपलब्ध होतील. गॅलक्सी S26 सीरीज गॅलक्सी AI ला पूर्णपणे एकात्मिक करणार आहे. फोन चालू करताच AI तुमच्या वापरानुसार स्मार्ट सूचना देईल, फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग सोपं करेल, रिअल-टाईम भाषांतर करेल आणि दैनंदिन जीवन “easy and effortless” बनवेल.
At the end of 2025, My projections were lower for the Samsung Galaxy S26 series.
— Jason C. (@_TheJasonC) February 24, 2026
However after reviewing the sales trends for the last three years.
Despite the increased hard cost in manufacturing and the perceived incremental upgrades by some consumers.
Samsung will meet… pic.twitter.com/7IaSyn621Y
S26 अल्ट्रा
S26 अल्ट्रा मध्ये प्रोफेशनल कॅमेरा सेटअप, मोठी बॅटरी आणि टॉप-लेव्हल परफॉर्मन्स अपेक्षित आहे. S26+ मध्यम-उच्च श्रेणीतील ग्राहकांसाठी योग्य असेल तर बेस S26 बजेट-फ्रेंडली फ्लॅगशिप असेल.
This is Samsung Galaxy S26 Ultra pic.twitter.com/zawyS8FOZw
— Ben Geskin (@BenGeskin) February 1, 2026
स्लीक डिझाइन
लीक झालेल्या माहितीनुसार हे फोन स्लीक डिझाइन, मजबूत बिल्ड क्वालिटी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान घेऊन येणार आहेत. भारतीय बाजारात हे फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये स्पर्धा करतील.
Samsung Galaxy S26 Ultra official promotion posters are out :
— Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) February 21, 2026
Confirmed features:
• Privacy display with Rounded edges
• 200MP HP2 f/1.4 + 50MP UW + 50MP 5x f/2.9 + 10MP 1/3.94 3x
• 12MP front AF
• 5000mAh battery with 31 hours of video playback
• 75% battery life in… pic.twitter.com/uWKZmWdefO
प्री-रिझर्वेशन सुरू
गॅलक्सी S26 सीरीजसाठी प्री-रिझर्वेशन आधीच सुरू झालं आहेत. फक्त 999 रुपये भरून तुम्ही Galaxy Pre-reserve VIP Pass मिळवू शकता. हे पैसे पूर्णपणे अंतिम खरेदी किंमतीत समायोजित केले जातील. प्री-रिझर्वेशन आज रात्री 11:59 वाजेपर्यंत सुरू राहील.
Another unboxing video of Galaxy S26 ultra , this time in black colour 😂 .
— Yash (@Phonenurd) February 24, 2026
I think there is nothing left to be unpacked in the actual event #GalaxyS26Ultra #GalaxyUnpacked #GalaxyAI #AIphone pic.twitter.com/p1gzBee2Nl
- प्री-रिझर्वेशनचे फायदे
2,699 रुपयांचा e-Store व्हाउचर (ॲक्सेसरीज किंवा इतर सॅमसंग प्रॉडक्ट्ससाठी) - प्री-ऑर्डरसाठी प्रायोरिटी अॅक्सेस (इव्हेंटनंतर लगेच बुकिंग)
- सर्वोच्च एक्सचेंज व्हॅल्यू लॉक-इन (सध्याच्या मूल्यांकनानुसार)
- दररोज 5,000 रुपयांचे e-Store व्हाउचर जिंकण्याची संधी आणि ग्रँड प्राईज 50,000 रुपये
- स्टोरेज अपग्रेड फ्री (प्री-ऑर्डर करणाऱ्यांसाठी)
प्री-रिझर्वेशन केल्यानंतर प्री-ऑर्डर करणे आवश्यक आहे. नाहीतर 999 रुपये परत मिळतील. एका मोबाईल नंबर किंवा ईमेलवर फक्त एकदा प्री-रिझर्वेशन करता येईल. COD उपलब्ध नसेल.
Galaxy S26 Ultra looks incredible 😍🔥
— Debayan Roy (Gadgetsdata) (@Gadgetsdata) February 1, 2026
✅ The individual rings are replaced by a single camera deco which looks much better
✅ More rounded corners
✅ Slimmer (but instead of making it slim Samsung should've increased the🔋)
5000mAh🔋in 2026 is too less
Image from @evleak pic.twitter.com/937okJR2Q2
प्री-रिझर्वेशन कसं करावं?
- Samsung Mobile India वेबसाइटवर जा.
- “Pre-reserve” किंवा “Pre-reserve Next Galaxy Device” बटणावर क्लिक करा.
- सॅमसंग अकाउंटनं लॉगिन करा किंवा गेस्ट म्हणून मोबाईल नंबर/ईमेलने सुरू करा.
- 999 रुपये क्रेडिट/डेबिट कार्ड, UPI, वॉलेट किंवा नेट बँकिंगनं भरा.
- Galaxy Pre-reserve VIP Pass त्वरित ईमेल आणि SMS नं मिळेल.
प्री-ऑर्डर इव्हेंटनंतर Samsung.com, Samsung Shop App, Amazon India आणि अधिकृत रिटेलर्सवर सुरू होईल. फोनची विक्री 11 मार्चपासून सुरू होईल.
गॅलक्सी S26 सीरीजची अपेक्षित किंमत (भारतात)
औपचारिक किंमत आजच्या इव्हेंटमध्ये जाहीर होईल. लीकनुसार: Galaxy S26 (12GB + 256GB) ची किंमत सुमारे 80,000 ते 83,000 रुपये असेल. Galaxy S26+ ची किंमत 95,000 ते 1,05,000 रुपये असू शकते आणि Galaxy S26 Ultra ची किंमत 1,35,000 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ही किंमत स्पर्धात्मक मानली जात आहे. एक्सचेंज, बँक ऑफर्स आणि e-Store व्हाउचरमुळं किंमत आणखी कमी होऊ शकते.
Galaxy Buds 4 सीरीज
फक्त फोनच नाही तर Galaxy Buds 4 आणि Galaxy Buds 4 Pro देखील लाँच होण्याची शक्यता आहे. हे फक्त ब्लॅक आणि व्हाइट कलरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Buds 4 Pro मध्ये अतिरिक्त Apricot कलर ऑप्शन असू शकतं, जे फक्त Samsung Online Store वर मिळेल. हे इयरबड्स गॅलक्सी AI सह एकत्रित काम करतील आणि प्रीमियम ऑडिओ अनुभव देतील.
लाँच का आहे महत्त्वाचं?
सॅमसंग गेल्या अनेक वर्षांपासून भारतात फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. S26 सीरीज AI च्या नवीन युगाची सुरुवात करेल. टायटॅनियम बिल्ड, शक्तिशाली प्रोसेसर, उत्कृष्ट कॅमेरा आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी यामुळं हे फोन प्रोफेशनल्स, गेमर्स आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी आदर्श ठरतील. इव्हेंटनंतर सोशल मीडियावर रिव्ह्यूज, बेंचमार्क आणि रिअल-यूज अनुभव येणार आहेत. प्री-रिझर्वेशन करणाऱ्यांना पहिल्या बॅचमध्ये फोन मिळण्याची शक्यता जास्त. आज रात्री 11:30 वाजता सॅमसंगचा गॅलक्सी अनपॅक्ड इव्हेंट पाहाण्यासाठी तयार रहा. प्री-रिझर्वेशन केलं असेल तर लगेच प्री-ऑर्डर करा. नवीन Galaxy AI, स्टाइलिश डिझाइन आणि शक्तिशाली परफॉर्मन्ससह हा फोन तुमचं दैनंदिन जीवन बदलणार आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्या तसंच Samsung India वेबसाइट आणि सोशल मीडिया फॉलो करा.
हे वाचलंत का :

