सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा: बॅटरी आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन्समध्ये बदल नाही; लीक झाले प्रमोशनल मटेरियल
सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा लवकरच (Samsung Galaxy S26 Ultra) येतेय! पण लीकनुसार बॅटरी, चार्जिंग आणि कॅमेरा S25 प्रमाणेच राहणार आहे.

Published : February 23, 2026 at 10:55 AM IST
नवी दिल्ली : सॅमसंग आपली नवीन पिढीची गॅलेक्सी S मालिका 25 फेब्रुवारी रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे होणाऱ्या पहिल्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये (Galaxy Unpacked Event 2026) लॉंच करण्याच्या तयारीत आहे. लॉंचच्या काही दिवस आधीच, गॅलेक्सी S26 अल्ट्राच्या कथित प्रमोशनल पोस्टर्स आणि मार्केटिंग मटेरियल ऑनलाइन लीक झाले आहेत. या लीकमध्ये फोनची बॅटरी, चार्जिंग स्पीड आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन्स उघड झाल्या आहेत. दुर्दैवानं, गॅलेक्सी S25 अल्ट्राप्रमाणेच यात कोणताही मोठा बदल दिसत नाही. X युजर @ya_sking12767 नं शेअर केलेल्या या अधिकृत दिसणाऱ्या रेंडर्समध्ये गॅलेक्सी S26, S26+, S26 अल्ट्रा यांच्यासह गॅलेक्सी बड्स 4 आणि बड्स 4 प्रो चे फोटो दिसताय.
Galaxy S26 series promote poster 🫣 pic.twitter.com/7eABisBsG9
— 🌟 너때문 🌟 (@ya_sking12767) February 21, 2026
बॅटरी आणि चार्जिंग
गॅलेक्सी S26 अल्ट्रामध्ये (Galaxy S26 Ultra) 5,000mAh बॅटरी असेल, जी मागील मॉडेलप्रमाणेच आहे. ही बॅटरी एका चार्जवर 31 तास व्हिडिओ प्लेबॅक देते. चार्जिंगसाठी 0 ते 75 टक्के 30 मिनिटांत होईल, जे S25 अल्ट्रासारखंच आहे. काही रिपोर्ट्सनुसार 60W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल, पण प्रत्यक्ष मागील मॉडेल प्रमाणेच सर्व राहील. अलीकडील अनेक अँड्रॉइड फ्लॅगशिपमध्ये मोठ्या बॅटरी आल्या आहेत, त्यामुळं सॅमसंगचं चाहत्यांना हे अपडेट निराश करणारं ठरू शकतं.
कॅमेरा सेटअप
रियर कॅमेरा युनिटमध्येही कोणताही बदल नाही. यात 200-मेगापिक्सेल मुख्य सेन्सर, 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड, 10-मेगापिक्सेल 3x ऑप्टिकल झूम टेलिफोटो आणि 50-मेगापिक्सेल 5x पेरिस्कोप टेलिफोटो असेल. फ्रंट कॅमेरा 12-मेगापिक्सेल राहील. प्रमोशनल मटेरियलमध्ये Private Display (शेजारील व्यक्तींना स्क्रीन दिसणार नाही) आणि AI-आधारित Photo Assist फीचर्सचा उल्लेख आहे.
इतर अपेक्षित स्पेसिफिकेशन्स
गॅलेक्सी S26 अल्ट्रामध्ये 6.9-इंच QHD+ M14 CoE डायनॅमिक AMOLED डिस्प्ले, Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट आणि 60W फास्ट चार्जिंग असेल. या मालिकेची किंमत मागील वर्षापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी S26 अल्ट्रामध्ये 6.9 -इंच QHD+ M14 CoE डायनॅमिक AMOLED डिस्प्ले, Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट (ग्लोबली), 12/16 GB RAM आणि 256/512/1TB स्टोरेज पर्याय अपेक्षित आहेत. हा फोन Android 16 वर आधारित One UI 8.5 सह येतील. Galaxy AI फीचर्स यावेळी अधिक मजबूत असतील. S26 सीरिजचे किंमत मागील मॉडेल्सपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, ज्यामुळं उत्साहींमध्ये चर्चा सुरू आहे.
हे वाचलंत का :

