ETV Bharat / technology

सॅमसंग गॅलेक्सी S26 सीरिज: गॅलेक्सी S26, गॅलेक्सी S26 प्लस आणि गॅलेक्सी S26 अल्ट्रा; कुठं मिळेल सर्वास स्तस्त ?

गॅलेक्सी S26, गॅलेक्सी S26 प्लस आणि गॅलेक्सी S26 अल्ट्रा जागतिक स्तरावर लॉंच झालेय. हे फोन कोणत्या देशात सर्वात स्वस्त खरेदी करता येईल, चला जाणून घेऊया...

Samsung Galaxy S26 Series
गॅलेक्सी S26 अल्ट्रा (Samsung)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : February 26, 2026 at 10:08 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद: सॅमसंगनं गॅलेक्सी S26 सीरिज भारत आणि जागतिक बाजारपेठेत लाँच केली आहे. या सीरिजमध्ये गॅलेक्सी S26, गॅलेक्सी S26 प्लस आणि गॅलेक्सी S26 अल्ट्रा यांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर लाँच झाल्यानं, भारतीय ग्राहकांना भारतातील किंमती आणि जागतिक किंमतींमधील फरक जाणून घेण्यात रस आहे. यासाठी आम्ही भारतातील किंमतींची अमेरिका, ब्रिटन, यूएई, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इत्यादी देशांशी तुलना केली आहे. या तुलनेमुळं तुम्हाला स्वस्त फोन इतर देशातून खरेदी करता येईल.

भारतातील किंमती
गॅलेक्सी S26 अल्ट्राच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 12GB RAM + 256GB साठी 1.40 लाख, 12GB RAM + 512GB साठी 1.60 लाख आणि 16GB RAM + 1TB साठी 1.90 लाख आहे. बेस मॉडेल गॅलेक्सी S26 ची किंमत 12GB RAM + 256GB साठी ₹87,999 आणि 12GB RAM + 512GB साठी 1.08 लाख आहे. मिड-रेंज गॅलेक्सी S26 प्लसची किंमत 12GB RAM + 256GB साठी 1.20 लाख आणि 12GB RAM + 512GB साठी 1.40 लाख आहे.

ModelRAMStoragePrice (INR)
Samsung Galaxy S26 Ultra12GB256GBRs 1,39,999
Samsung Galaxy S26 Ultra12GB512GBRs 1,59,999
Samsung Galaxy S26 Ultra16GB1TBRs 1,89,999
Samsung Galaxy S2612GB256GBRs 87,999
Samsung Galaxy S2612GB512GBRs 1,07,999
Samsung Galaxy S26 Plus12GB256GBRs 1,19,999
Samsung Galaxy S26 Plus12GB512GBRs 1,39,999

जागतिक तुलना आणि निष्कर्ष
तुलनेनुसार, भारतातील किंमती यूके, जर्मनी, मलेशिया, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांपेक्षा स्पर्धात्मक आणि स्वस्त आहेत. या देशांमध्ये चलन रुपांतर केल्यास किंमती जास्त होते. दुसरीकडं, अमेरिका, यूएई, कॅनडा आणि चीन यांसारख्या देशांमध्ये काही व्हेरिएंट्स भारतापेक्षा स्वस्त आहेत. विशेषतः गॅलेक्सी S26 अल्ट्रा अमेरिकेत सर्वात स्वस्त आहे, जिथं भारतीय किंमतीपेक्षा हे फोन सुमारे 21,865 रुपयांनी स्वस्त आहे. गॅलेक्सी S26 प्लस कॅनडामध्ये सर्वात स्वस्त आहे. हा फोन तिथं खरेदी केल्यास 18,277 चा फायदा होईल.

Samsung Galaxy S26 Series: US Prices

ModelsUS PricesINR ConvertPrice Difference (Base variant)
Galaxy S26 Ultra$ 1,299.99Rs 1,39,999Rs 21,865.24
Galaxy S26$ 1,099.99Rs 87,999Rs -11,960.2
Galaxy S26 Plus$ 1,299.99Rs 1,19,999Rs 1,865.24

Samsung Galaxy S26 Series: UK Prices

ModelsUK PricesINR ConvertPrice Difference (Base variant)
Galaxy S26 Ultra£ 1,279Rs 1,39,999Rs -17,623.94
Galaxy S26£ 879Rs 87,999Rs -20,328.26
Galaxy S26 Plus£ 1,099Rs 1,19,999Rs -15,440.88

Samsung Galaxy S26 Series: UAE Prices

ModelsUAE PricesINR ConvertPrice Difference (Base variant)
Galaxy S26 Ultra5,099 AEDRs 1,39,999Rs 13,712.27
Galaxy S263,599 AEDRs 87,999Rs -1,137.29
Galaxy S26 Plus4,299 AEDRs 1,19,999Rs 13,525.84

Samsung Galaxy S26 Series: Australia Prices

ModelsAustralia PricesINR ConvertPrice Difference (Base variant)
Galaxy S26 UltraAU$ 2,199Rs 1,39,999Rs -2,468.6
Galaxy S26AU$ 1,549Rs 87,999Rs -12,356.76
Galaxy S26 PlusAU$ 1,849Rs 1,19,999Rs 207

Samsung Galaxy S26 Series: Canada Prices

ModelsCanada PricesINR ConvertPrice Difference (Base variant)
Galaxy S26 Ultra$ 1,899.99 (CAD)Rs 1,39,999Rs 13,678.32
Galaxy S26$ 1,249.99 (CAD)Rs 87,999Rs 4,893.51
Galaxy S26 Plus$ 1,529.99 (CAD)Rs 1,19,999Rs 18,277.74

Samsung Galaxy S26 Series: China Prices

ModelsChina PricesINR ConvertPrice Difference (Base variant)
Galaxy S26 UltraCNY 9,999Rs 1,39,999Rs 7,700.63
Galaxy S26CNY 6,999Rs 87,999Rs -4,605.89
Galaxy S26 PlusCNY 7,999Rs 1,19,999Rs 14,162.95

Samsung Galaxy S26 Series: Germany Prices

ModelsGermany PricesINR ConvertPrice Difference (Base variant)
Galaxy S26 Ultra1,449 €Rs 1,39,999Rs -15,685.91
Galaxy S26999 €Rs 87,999Rs -19,336.56
Galaxy S26 Plus1,249 €Rs 1,19,999Rs -14,197.31

Samsung Galaxy S26 Series: Malaysia Prices

ModelsMalaysia PricesINR ConvertPrice Difference (Base variant)
Galaxy S26 UltraRM 5,999Rs 1,39,999Rs -824.83
Galaxy S26RM 4,399Rs 87,999Rs -15,265.55
Galaxy S26 PlusRM 5,399Rs 1,19,999Rs -6,740.1

Samsung Galaxy S26 Series: France Prices

ModelsFrance PricesINR ConvertPrice Difference (Base variant)
Galaxy S26 Ultra1,469 €Rs 1,39,999Rs -17,862.68
Galaxy S26990 €Rs 87,999Rs -18,388.38
Galaxy S26 Plus1,269 €Rs 1,19,999Rs -16,370.28

बेस मॉडेल गॅलेक्सी S26 साठी भारत हा जागतिक स्तरावर सर्वात स्पर्धात्मक बाजारपेठ आहे, जिथं बहुतेक देशांपेक्षा किंमत कमी आहे. त्यामुळं स्टँडर्ड गॅलेक्सी S26 भारतातूनच खरेदी करणे उत्तम ठरेल. एकंदरीत, मॉडेलनुसार किंमत बदलते. तरीही भारतातील किंमती बहुतेक ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक आणि स्पर्धात्मक आहेत, ज्यामुळं देशात खरेदी करणे हा मजबूत पर्याय आहे.

हे वाचलंत का :

  1. Samsung Galaxy S26 Series : गॅलेक्सी S26, गॅलेक्सी S26 प्लस आणि गॅलेक्सी S26 अल्ट्रा आणि बड्स4 सीरिज लाँच
  2. रियलमी C83 5G : 7 मार्चला भारतात होणार लॉंच, 144Hz डिस्प्ले आणि 7000mAh बॅटरी
  3. OnePlus 15R च्या किमतीत वाढ; कधीपासून लागू होणार नवीन किंमत