रेडमी वॉच 6 जागतिक बाजारात लॉंच; 12 दिवसांची बॅटरी लाइफ आणि प्रिमियम फीचर्स
रेडमी वॉच 6 जागतिक बाजारात लॉंच झालीय. 2.07 इंच AMOLED डिस्प्ले, ड्युअल GPS आणि 12 दिवस बॅटरीसह हे बाजारात दाखल झालं आहे.

Published : May 6, 2026 at 12:47 PM IST
मुंबई : शाओमीची उप ब्रँड रेडमीनं आपली नवा स्मार्टवॉच रेडमी वॉच 6 आंतरराष्ट्रीय बाजारात लॉंच केलीय. चीनमध्ये ऑक्टोबर 2025 मध्ये Redmi K90 आणि K90 Pro Max सोबत प्रथम लॉंच झालेल्या या स्मार्टवॉचचे दोन व्हेरिएंट्स रेडमी वॉच ६ आणि वॉच ६ एनएफसी (Redmi Watch 6 and Watch 6 NFC) आता पोलंड, रोमानिया आणि थायलंडसारख्या देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. 2.07 इंचाच्या मोठ्या AMOLED डिस्प्ले, ड्युअल L1 GPS अँटेना आणि 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड्ससह या वॉच फिटनेस आणि हेल्थ ट्रॅकिंगप्रेमींसाठी आकर्षक पर्याय ठरतील अशी अपेक्षा आहे.
किंमत आणि उपलब्धता : लिस्टिंगनुसार, रेडमी वॉच 6 पोलंड, रोमानिया आणि थायलंडमध्ये विक्रीस सुरुवात झाली आहे. एनएफसी व्हेरिएंट सध्या फक्त पोलंडमध्ये उपलब्ध आहे. या वॉचची पोलंडमध्ये किंमत PLN 449(सुमारे 10,000) तर एनएफसी व्हेरिएंट PLN 499 (सुमारे 11,000) मध्ये उपलब्ध आहे.रोमानियातील किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास ही वॉच RON 519(सुमारे 6,600) मध्ये मिळेल, तर थायलंडमध्ये ती THB 3,190 (सुमारे 8,200)मध्ये उपलब्ध असेल.भारतात अद्याप ही वॉच लॉंच झालेली नाहीय. त्यामुळं भारतात या वॉचच्या किंमती आकर्षक असण्याची शक्यता असून त्या लवकरच भारतीय बाजारात दाखल होतील, अशी अपेक्षा आहे.
रेडमी वॉच 6 वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स : रेडमी वॉच 6 मध्ये 2.07 इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रिझोल्यूशन 432 × 514 पिक्सेल्स, 60Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. 2.5D कर्व्ड ग्लास आणि पातळ बेझल्समुळं स्क्रीन-टू-बॉडी रेशो 82 टक्के इतका आहे. डिस्प्ले अल्वेज-ऑन सपोर्ट करतो आणि वापरकर्ते कस्टमायझेबल वॉच फेसेस वापरू शकतात.हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी वॉचमध्ये 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स आहेत.हृदय गती (Heart Rate), SpO2, स्लीप अॅनालिसिस, स्ट्रेस मॉनिटरिंग सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. अॅक्सेलरोमीटर, जायरोस्कोप, जिओमॅग्नेटिक सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर आणि ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर (अंडरवॉटर डिटेक्शनसह) यासारखे अनेक सेन्सर्स आहेत.
कनेक्टिव्हिटी : नेव्हिगेशनसाठी ड्युअल L1 GNSS अँटेना देण्यात आले आहेत. हे GPS, BeiDou, GLONASS, Galileo आणि QZSS सॅटेलाइट सिस्टम्सना सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.4 आणि NFC (NFC मॉडेलमध्ये) उपलब्ध आहे.
बॅटरी आणि डिझाइन : 550mAh बॅटरीसह रेडमी वॉच 6 नियमित वापरात 12 दिवस आणि बॅटरी सेव्हर मोडमध्ये 24 दिवस टिकू शकतो. वॉचची जाडी फक्त 9.9mm आणि वजन (स्ट्रॅपशिवाय) 31 ग्रॅम आहे. 5ATM वॉटर रेझिस्टन्समुळं पोहण्यासारख्या क्रियांमध्येही ती वापरता येईल. रेडमी वॉच 6 मध्यम किंमतीत प्रिमियम अनुभव देणारी स्मार्टवॉच आहे. मोठा ब्राइट डिस्प्ले, अचूक GPS ट्रॅकिंग आणि लांब बॅटरी लाइफ यामुळं फिटनेस उत्साही आणि दैनंदिन वापरकर्त्यांसाठी ती योग्य पर्याय ठरू शकते. जागतिक बाजारातील प्रतिसाद पाहता भारतात ती लवकरच लॉंच होण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :

