ETV Bharat / technology

Redmi Note 17 Pro Max 5G : ग्लोबल मार्केटमध्ये लॉंच, काय आहे खास फीचर?!

शाओमीनं Redmi Note 17 Pro Max 5G ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला. शक्तिशाली बॅटरी, अमोलेड डिस्प्ले आणि एआय फीचर्ससह हा फोन भारतात 15 सप्टेंबरला लॉंच होतोय.

Redmi Note 17 Pro Max 5G
Redmi Note 17 Pro Max 5G (Xiaomi)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : August 28, 2026 at 11:11 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : शाओमीनं Redmi Note 17 Pro Max 5G स्मार्टफोन निवडक जागतिक बाजारात लाँच केला आहे. हा फोन 6.83 इंचच्या अमोलेड डिस्प्लेसह येतो, ज्यात Snapdragon 6 Gen 5 chipset आणि 512 GB पर्यंत स्टोरेज आहे. 50 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यात ओआयएस, 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 10,000 mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी 100 वॅट वायर्ड चार्जिंगसह उपलब्ध आहे. आयपी68 रेटिंग आणि हायपरओएस 3 या फोनला खास बनवतात. रेडमी नोट 17 प्रो आणि प्रो मॅक्स भारतात 15 सप्टेंबरला येण्याची शक्यता आहे.

Redmi Note 17 Pro Max 5G
Redmi Note 17 Pro Max 5G (Xiaomi)

किंमत आणि उपलब्धता : Redmi Note 17 Pro Max 5G ची किंमत जपानमध्ये 8 GB + 256 GB व्हेरिएंटसाठी 79,980 येन (सुमारे 47,900रुपये) आणि 8 GB + 512 GB मॉडेलसाठी 99,980 येन (सुमारे 59,900 रुपये) आहे. हा फोन क्लाउडब्रश, पर्पल आणि ब्लॅक या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारातही या किंमतीच्या आसपासच अपेक्षा आहेत, ज्यामुळं मिड-रेंज सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होईल.

Redmi Note 17 Pro Max 5G
Redmi Note 17 Pro Max 5G (Xiaomi)

डिस्प्ले : फोनमध्ये 6.83 इंचचा अमोलेड डिस्प्ले आहे, ज्याची रिझोल्यूशन 1.5के आणि रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज पर्यंत आहे. पॅनल 3,500 निट्स ब्राइटनेस सपोर्ट करतो. 12-बिट कलर डेप्थ, डीसीआय-पी३ कलर गॅमट, एचडीआर10+ आणि डॉल्बी व्हिजन यामुळं व्हिज्युअल अनुभव उत्कृष्ट होतो. कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन, 3,840 हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग आणि वेट टच टेक्नॉलॉजी 2.0 यामुळं रोजच्या वापरात सोयीस्कर ठरेल.

Redmi Note 17 Pro Max 5G
Redmi Note 17 Pro Max 5G (Xiaomi)

पावरफुल परफॉर्मन्स आणि एआय फीचर्स : Snapdragon 6 Gen 5 processor, 8GB LPDDR5X रॅम आणि 512 जीबी पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज या फोनला स्मूथ परफॉर्मन्स देतात. अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3 चालतो. एआय इरेजर प्रो, एआय रिफ्लेक्शन रिमूव्हल, एआय इमेज एन्हांसमेंट, एआय स्काय आणि एआय बोकेह सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. गूगल जेमिनी फीचर्सही सपोर्ट करतात.

Redmi Note 17 Pro Max 5G
Redmi Note 17 Pro Max 5G (Xiaomi)

कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी : मागील बाजूस 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा ओआयएससह आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. 4के व्हिडिओ 30 फ्रेम्सपर्यंत रेकॉर्ड करता येते. फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा असून तोही 4के व्हिडिओ सपोर्ट करतो. 5जी, ड्युअल सिम, वाय-फाय 6, ब्लूटूथ 6.0, एनएफसी आणि इन्फ्रारेड ब्लास्टर उपलब्ध आहेत. अॅक्सिलरोमीटर, जायरॉस्कोप, कंपास, प्रॉक्सिमिटी आणि अॅम्बियंट लाइट सेन्सरही आहेत.

बॅटरी आणि बिल्ड क्वॉलिटी : 10,000 एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी 100 वॅट फास्ट चार्जिंग आणि 27 वॅट रिव्हर्स वायर्ड चार्जिंग देते. इन-स्क्रीन फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक सिक्युरिटीसाठी आहे. आयपी66 आणि आयपी68 रेटिंगमुळं पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. हा फोन बॅटरी लाइफ, डिस्प्ले आणि कॅमेरामध्ये नवीन बेंचमार्क सेट करेल.

हे वाचलंत का :

  1. सॅमसंग गॅलेक्सी S26 FE :One UI 9 आणि गॅलेक्सी AI सह भारतात लॉंच, फॅन्ससाठी सुपरचार्ज्ड स्मार्टफोन !
  2. Lava Bold N4 Lite : फक्त 7,999 रुपयात भारतात लॉंच!
  3. 8000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह Realme P4s 5G भारतात लाँच