Redmi Note 17 : 8,000mAh बॅटरी आणि Snapdragon 4 Gen 4 प्रोसेसरसह लाँच
Redmi Note 17 5G भारतात 8,000mAh ची बॅटरी, 7-इंचाचा डिस्प्ले आणि Snapdragon 4 Gen 4 प्रोसेसरसह लॉंच झालाय.

Published : August 6, 2026 at 12:36 PM IST
मुंबई : Redmi Note 17 5G हा नोट 17मालिकेतील पहिला स्मार्टफोन म्हणून आज भारतात अधिकृतपणे लाँच झाला. चीनमध्ये पदार्पणानंतर काही आठवड्यांनी हा फोन भारतात आला असून त्याची वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स चिनी आवृत्तीशी जवळजवळ समान आहेत. ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 सिरीज चिपसेटवर चालणारा हा स्मार्टफोन 8,000mAh बॅटरीसह येतो. 6.9-इंच ट्रूकलर अमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि लेटेस्ट हायपरओएस 3 यामुळं या फोननं मिड-रेंज सेगमेंटमध्ये धमाका केलाय.

किंमत, उपलब्धता आणि रंग पर्याय : भारतात Redmi Note 17 5G ची किंमत बेस व्हेरिएंटसाठी 27,999 रुपये आहे, ज्यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. टॉप व्हेरिएंट 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजसाठी 30,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. एसबीआय, अॅक्सिस बँक आणि कोटक क्रेडिट कार्ड्सवर 3,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट ऑफर कंपनी देत आहे. फोन 12 ऑगस्टपासून अॅमेझॉन आणि शाओमी इंडिया ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. आर्क्टिक ब्लू, डार्क नाईट आणि स्टारलाईट पर्पल या तीन रंगांमध्ये तो ऑफर केला जात आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि प्रमुख वैशिष्ट्ये: Redmi Note 17 5G ड्युअल-सिम स्मार्टफोन आहे आणि त्यात अँड्रॉइड 16 वर आधारित शाओमीचे नवीनतम हायपरओएस 3 येते. कंपनी चार वर्षांच्या ओएस अपग्रेड्स आणि सहा वर्षांच्या सिक्युरिटी पॅचेसचे आश्वासन देते. 6.9-इंच फुल-एचडी+अमोलेड डिस्प्लेला 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 100टक्के डीसीआय-पी3 कलर गॅमट, 1,800 निट्स पीक ब्राइटनेस, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 960Hz पीडब्ल्यूएम डीसी डिमिंग, कॉर्निंग गोरिला ग्लास ७i संरक्षण आणि हायड्रोटच 2.0 सपोर्ट आहे, ज्यामुळं ओल्या बोटांनीही चांगला टच रेस्पॉन्स मिळतो.

स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट : पॉवरसाठी 4nm प्रोसेसवर बनवलेला ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट वापरला आहे. 8 जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256 जीबी पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेज (मायक्रोएसडी कार्डद्वारे 2टीबी पर्यंत विस्तारणीय) आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी 10,416 स्क्वेअर मिमी ग्राफाइट हीट डिसिपेशन एरिया असलेली व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम आहे. आयपी65 रेटिंगमुळं धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळतं.

ड्युअल रियर सेटअप : कॅमेरा विभागात ड्युअल रियर सेटअप आहे, ज्यात 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा (एफ/1.8 अपर्चर आणि 2x डिजिटल झूम) आणि एलईडी फ्लॅश आहे. दुसरा सेन्सर अनिर्दिष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा (एफ/2.0) होल-पंच कटआउटमध्ये बसवला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग 1080पी/30एफपीएस पर्यंत समर्थित आहे.

8,000mAh बॅटरी : 8,000mAh बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 22.5W वायर्ड रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्जवर युट्यूब व्हिडिओ प्लेबॅक 28.29 तास, व्हॉट्सअॅप 24.14 तास, गूगल मॅप्स नेव्हिगेशन 10.58 तास किंवा बीजीएमआय गेमप्ले 13.89 तास चालू शकतो. एकूणच, मोठी बॅटरी, मोठा डिस्प्ले, दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट आणि स्पर्धात्मक किंमत यामुळं Redmi Note 17 5G भारतीय बाजारातील बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन्सच्या शर्यतीत मजबूत दावेदार ठरू शकतो.

हे वाचलंत का :

