Redmi 15C 5G भारतात लवकरच होणार लॉंच; किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक
Redmi 15C 5G भारतात डायमेंसिटी 6300 चिप, 6000mAh बॅटरी आणि 120हर्ट्झ डिस्प्लेसह लॉंच होणार आहे.

Published : November 17, 2025 at 5:09 PM IST
मुंबई : शाओमीचा सब-ब्रँड रेडमी नवीन बजेट 5G स्मार्टफोन Redmi 15C 5G भारतात लवकरच लॉंच करण्याची तयारी करत आहे. प्रसिद्ध टिप्स्टर अभिषेक यादव (@yabhishekhd) यांनी एक्सवर पोस्ट करून या फोनच्या भारतातील किंमती, रॅम-स्टोरेज व्हेरिएंट्स आणि प्रमुख स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक केली आहे. हा फोन सप्टेंबर महिन्यात काही जागतिक बाजारपेठांमध्ये (पोलंडसह) आधीच लॉंच झाला आहे, आणि भारतात तो त्याच स्पेसिफिकेशन्ससह येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतातील अपेक्षित किंमत आणि व्हेरिएंट्स
- 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज – 11,500
- 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज – 12,500
- 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज – 14,500
जागतिक बाजारपेठेत (पोलंडमध्ये) हा फोन 4 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटसाठी PLN 977 (सुमारे 19,000) किंमतीला उपलब्ध आहे. भारतात मात्र स्टोरेज कमी करून किंमत खूपच आकर्षक ठेवली जाणार आहे, ज्यामुळं हा फोन 15 हजारांच्या आत येणारा एक मजबूत 5जी पर्याय ठरू शकतो.

प्रमुख स्पेसिफिकेशन्स (अपेक्षित)
- डिस्प्ले : 6.9 इंच एचडी+ (720×1600पिक्सेल) एलसीडी, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 810 निट्स पीक ब्राइटनेस, नॉच डिझाइन
- प्रोसेसर : मीडियाटेक डायमेंसिटी 6300(6 एनएम प्रोसेस), ऑक्टा-कोर
- रॅम आणि स्टोरेज: 4/6/8 जीबी LPDDR4X रॅम + 128 जीबी स्टोरेज (मायक्रोएसडीद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवता येईल)
- कॅमेरा : मागे ड्युअल कॅमेरा 50 मेगापिक्सेल प्रायमरी (f/1.8) + अनस्पेसिफाइड सेकंडरी सेन्सर; पुढे 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा (f/2.0)
- बॅटरी : 6,000 एमएएच + 33 वॉट फास्ट चार्जिंग
- कनेक्टिव्हिटी : 5G, ब्लूटूथ 5.4, वाय-फाय, 3.5 मिमी हेडफोन जॅक
- इतर: IP64 डस्ट अँड स्प्लॅश रेझिस्टन्स, डस्क पर्पल, मिडनाइट ब्लॅक आणि मिंट ग्रीन कलर ऑप्शन्स

मोठी बॅटरी
हा फोन रेडमीच्या बजेट सेगमेंटमधील लोकप्रिय मालिकेचा पुढचा टप्पा आहे. 6,000 एमएएचची मोठी बॅटरी, 120 हर्ट्झ डिस्प्ले आणि डायमेंसिटी 6300 चिपसेट यामुळं गेमिंग, मल्टिटास्किंग आणि रोजच्या वापरात चांगली कामगिरी मिळेल अशी अपेक्षा आहे. तसंच 33 वॉट चार्जिंगमुळं मोठ्या बॅटरीला लवकर चार्ज करता येईल.

किती असले किंमत
सध्या रेडमी, पोको आणि रियलमी यांच्यात 15 हजारांच्या खालील 5G सेगमेंटमध्ये तीव्र स्पर्धा आहे. रेडमी 15c 5G या किंमतीत येत असल्यास तो Moto G35 5G, Realme Narzo 70x 5G आणि Samsung Galaxy M16 5G ला थेट टक्कर देईल. रेडमीनं अधिकृतपणे लॉंच डेट जाहीर केलेली नाही, पण लीकनुसार डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 पर्यंत हा फोन भारतात विक्रीस येऊ शकतो.

हे वाचलंत का :

