10,001mAh बॅटरी असलेला नविन स्मार्टफोन लवकरच होतोय लॉंच
Realme लवकरच आपल्या नविन स्मार्टफोन लॉंचची तयारी करत आहे. हा फोन 5 मार्च रोजी भारतात 10,001mAh बॅटरीसह लॉंच होणार आहे.

Published : February 26, 2026 at 2:53 PM IST
मुंबई : Realme Power Narzo 5G: Realme लवकरच आपल्या नविन स्मार्टफोन लॉंचची तयारी करत आहे. हा फोन 5 मार्च रोजी भारतात 10,001mAh बॅटरीसह लॉंच होणार आहे. हा स्मार्टफोन Realme च्या अधिकृत स्टोअरसह Amazon वर उपलब्ध अेसल. या नविन स्मार्टफोनचं नाव Realme Power Narzo 5G असून त्यांची मायक्रोसाईट देखील लाइव्ह झाली आहे. चला जाणून घेऊया या फोनमधील खास फीचर्सबद्दल...
10,001mAh बॅटरी
realme Narzo Power 5G चं खास वैशिष्ट्ये म्हणजे त्याची सर्वात मोठी 10,001mAh बॅटरी असेल. ही बॅटरी 80 W फास्ट चार्जिंग आणि 27W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन इतर गॅझेट्स देखील चार्ज करू शकतो, म्हणजेच या फोनचा तुम्ही पॉवर बँक म्हणून देखील वापर करू शकता. फोनचा स्टँडबाय टाइम 38 दिवसांचा असेल. हा फोन 36 मिनिटांत 50% चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे.
Realme Narzo Power 5G डिस्प्ले
Realme Narzo Power 5G मध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 6.8 इंचाचा AMOLED कर्व्ड डिस्प्ले आहे. हा फोन 144 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येईल. या फोनचं पॅनेल 6500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देतो असा दावा केला जातो, ज्यामुळं बाहेरील तीव्र प्रकाशातही HDR सारखी कामगिरी मिळते.
शक्तिशाली प्रोसेसर
Realme Narzo Power 5G शक्तीशाली प्रोसेसर असणार आहे. फोनला स्मूथ लावण्यासाठी डायमेन्सिटी 7400 चिपसेट मिळेल, हा चिप हायपर व्हिजन+ एआय चिपसह येईल. या प्रोसेसरमुळं इमेज प्रोसेसिंग, गेमिंग परफॉर्मन्स आणि सिस्टम कार्यक्षमता सुधारेल.
शक्तिशाली कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX882 प्राथमिक कॅमेरा देण्यात येणार आहे. हा कॅमेरा OIS सपोर्टसह येईल. तसंच 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स यात मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, फोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असेल. हा फोन 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करेल.
किंमत आणि रंग तपशील
Realme Narzo Power 5G ची मायक्रोसाइट देखील लाईव्ह झाली आहे. हा फोन टायटन ब्लू आणि टायटन सिल्व्हर रंग पर्यायांमध्ये येईल. आगामी Realme Narzo Power 5G हा Realme P4 Power 5G चा रिब्रँडेड आवृत्ती असण्याची शक्यता आहे. नविन लीकनुसार नार्झो पॉवरची सुरुवातीची किंमत सुमारे 26,000 रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र, किंमतीबाबत अधिकृत माहिती अजून कंपनीनं दिलेली नाहीय. लॉंचपूर्वी अधिकृत किंमत समोर येईल.
दीर्घ सॉफ्टवेअर सपोर्ट
हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित Realme UI 7.0 वर चालतो. कंपनीनं सांगितलं की या फोनला तीन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि चार वर्षांच्या सिक्युरिटी पॅच मिळेल. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी या फोनला IP66+IP68+IP69 रेटिंग मिळेल.
हे वाचलंत का :

